Donald Trump On Iran: मध्यपूर्वेतील युद्ध संपणार? डोनाल्ड ट्रम्प यांची कतारच्या पंतप्रधानांशी चर्चा; इराणला दिला थेट इशारा

Donald Trump Iran Nuclear Weapons: इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्र मिळू देणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
Donald Trump Iran Nuclear Weapons
Donald Trump Iran Nuclear WeaponsPudhari
Published on: 
Updated on: 

Donald Trump Iran Nuclear Weapons: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे विधान केले आहे. कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जासिम अल थानी यांच्याशी आपली सविस्तर चर्चा झाल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली. या चर्चेत प्रामुख्याने इराण आणि मध्यपूर्वेतील सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल'वर ही माहिती पोस्ट केली. कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE), बहरीन, कुवेत आणि इतर देशांना सध्याची परिस्थिती कायम ठेवणे पसंत असल्याचे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. यामध्ये इराणवरील सागरी नाकेबंदी सुरू ठेवण्यासह 'ऑपरेशन आयर्न गेट' या नव्या मोहिमेचाही समावेश असल्याचे त्यांनी नमूद केले.

इराणला अण्वस्त्र मिळू देणार नाही, ट्रम्प यांचा इशारा

इराणला कोणत्याही परिस्थितीत अण्वस्त्र मिळू देणार नाही, यावर सर्व देशांचे एकमत असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. इराणला अण्वस्त्र मिळावेत हे अमेरिकेला मान्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Donald Trump Iran Nuclear Weapons
Israel Politics Election Twist: इस्त्रायलच्या राजकारणात मोठा ट्विस्ट... कट्टर विरोधक गळ्यात गळे घालणार; कारण सत्ता नाही तर दुसरंच?

मध्यपूर्वेतील परिस्थितीत कोणताही बदल झाला किंवा संघर्ष पुन्हा वाढला, तर अमेरिका कारवाईसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला. अमेरिकेचे सैन्य कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इस्रायलसह मध्यपूर्वेच्या सुरक्षेचा दावा

इस्रायल आणि संपूर्ण मध्यपूर्वेला इराणकडून निर्माण होणाऱ्या धोक्यापासून सुरक्षित ठेवण्यात आल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. या संघर्षावर तोडगा काढण्याच्या दिशेने सकारात्मक हालचाली सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Donald Trump Iran Nuclear Weapons
Gold Silver Price Today: दिवाळी पाडव्याच्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ; चांदीच्या दरात मात्र घसरण, खरेदी करण्याआधी आजचे दर पाहा

या लष्करी संघर्षाच्या काळात अमेरिकेचे हितसंबंध सुरक्षित ठेवणे हे आपले प्राधान्य असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. हा संघर्ष संपल्यानंतर अमेरिकेतील नागरिकांसह जगातील इतर देशही अधिक सुरक्षित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ट्रम्प यांच्या या विधानामुळे मध्यपूर्वेतील संघर्षाबाबत अमेरिकेची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. मात्र, इराणवरील नाकेबंदी, अण्वस्त्रांचा मुद्दा आणि लष्करी कारवाईबाबत पुढे काय होणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.