

The Australian Transport Safety Bureau ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड येथील एक थरारक घटना समोर आली आहे. याठिकाणी प्रोफेशनली स्कायडायव्हिंग केले जाते. यावेळी विमानातून काही स्कायडायव्हर्स उडी घेत असतानाच एक अपघात घडला. एक स्कायडायव्हर उडी मारण्याच्या तयारीत असतानाच अपघात घडतो व त्याचे सेकंडरी पॅराशूट विमानाच्या पाठीमागील पंखांच्या फ्लॅपमध्ये अडकते. ही घटना विमानातील कॅमेऱ्याने शूट झाली. तसेच स्कायडाव्हर्सच्या बोप्रोमध्येही शूट झाल्याचे दिसत आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून काळजाचा ठोका मात्र चुकतो. ऑस्ट्रेलियन ट्रान्सपोर्ट सेफ्टी ब्युरोने २० सप्टेंबर २०२५ रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ आज जारी केला आहे.
....आणि पॅराशूट अडकले
या व्हिडीओत दिसत आहे दोन स्काय डायव्हर्स एकाचवेळी विमानातून उडी घेत आहेत. त्याचवेळी जोरदार वाऱ्यामुळे एका स्कायडायर्व्हसचे पॅराशूट उघडते आणि ते थेट विमानाच्या पंखाला गुंडाळते त्याचवेळी वाऱ्याच्या वेगाने तो स्कायडार्व्हर त्या पंखाला जाऊन लोंबकळत राहतो. त्यावेळी त्याचे आयुष्य संपलेच असे वाटते कारण एवढ्या उंचीवरुन पडल्यानंतर त्याचे वाचने मुश्किलच दिसते होते. पण काही वेळ तो लोंबकळत राहतो. नंतर ते पॅराशूटच्या दोऱ्या कापतो तोपर्यंत इतर स्कायडायर्व्हस उड्या मारतात
मुख्य पॅराशूटमुळे किरकोळ दुखापतीसह लँडीग
व्हिडिओमध्ये दिसते की, स्कायडायव्हरच्या राखीव पॅराशूटची मूठ विमानांच्या पंखाच्या फ्लॅपमध्ये अडकली आणि तो चुकून उघडला गेला, ज्यामुळे तो पॅराशूटच्या साहाय्याने लटकत राहिला. पण तो पॅराशूटच्या दोऱ्या कापतो व हवेत झेप घेतो काही वेळाने तो मुख्य पॅराशूट उघडतो व गिरक्या घेत खाली येतो व काहीशा वेगाने जमीनीवर आपटतो. या डायव्हरला किरकोळ दुखापत झाली आहे.
विमान उतरेपर्यंत पॅराशूटचा तुकडा फ्लॅपमध्ये अडकलेला
उत्तर क्वीन्सलँडमधील टली विमानतळावर उड्डाणादरम्यान, ही घटना घडली स्कायडायर्व्हर खाली उतरल्यानंतर काही वेळाने विमान धावपट्टीवर उतरते त्यावेळी त्याच्या पंखाच्या फ्लॅपला पॅराशूटचा तुकडा अडकलेला दिसतो. स्कायडायर्व्हस जेव्हा विमानाला अडकातो तेव्हा वैमानिकानेही कौशल्याने परिस्थिती हाताळल्याचे दिसून येते. विमानाला समपातळीत ठेवण्यासाठी वैमानिकाला पूरेपूर प्रयत्न करतो. अन्यथा त्या स्कायडार्व्हसच्या जीवावर बेतले असते.