

न्यूयॉर्क : एका खगोल छायाचित्रकाराने आकाशातून खाली उडी ठोकलेल्या स्कायडायव्हरचा सूर्याच्या तेजस्वी पृष्ठभागासोबत अगदी जुळलेला एक अफलातून शॉट कॅमेर्यात कैद केला आहे. या शॉटकडे पाहिल्यावर, हा साहसी वीर आपल्या मुख्य तार्यासमोर अवकाशातून खाली झेपावत असल्याचा भास होतो.
अमेरिकेतील अॅरिझोना-स्थित खगोल छायाचित्रकार अँर्ड्यू मॅककार्थी, जो सूर्य आणि अंतराळ छायाचित्रणात विशेष कौशल्य ठेवतो, त्याने हा अशक्यप्राय वाटणारा फोटो 8 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री जवळपास 9.30) च्या आसपास काढला. ‘द फॉल ऑफ इकारस’ असे नाव दिलेल्या या शॉटकडे मॅककार्थीने अत्यंत अचूक नियोजन आवश्यक असल्याचे म्हटले आहे. सामाजिक प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, हा कदाचित त्याच्या प्रकारचा पहिलाच फोटो असेल.
या फोटोतील स्कायडायव्हर यूट्यूबर आणि संगीतकार गॅब्रिएल सी. ब्राउन हा होता. त्याने सुमारे 3,500 फूट (1,070 मीटर) उंचीवरून एका लहान प्रोपेलर-शक्तीवर चालणार्या विमानातून उडी मारली होती, जो मॅककार्थीच्या कॅमेर्यापासून सुमारे 8,000 फूट (2,440 मीटर) दूर होता. ब्राउनने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये या शूटचे काही पडद्यामागील फोटो शेअर केले आहेत, ज्यात मॅककार्थीसोबतचा विजय साजरा करतानाचा एक व्हिडीओ देखील आहे. मॅककार्थीने सांगितले, ‘व्हिडीओमध्ये तुम्ही माझ्या चेहर्यावरचा उत्साह पाहू शकता.
माझ्या मॉनिटरवर ते अचूक टिपलेले पाहणे रोमांचक होते. हा फोटो दिवसाच्या पहिल्या आणि एकमेव उडीमध्ये कॅप्चर करण्यात आला. आठवड्यांच्या तपशीलवार नियोजनानंतरही, विमान सूर्यासोबत योग्यरीत्या जुळवण्यासाठी सहा प्रयत्न करावे लागले. मॅककार्थीने ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये क्लार्कने उडी मारल्याचा अचूक क्षण दिसतो. मॅककार्थीने सांगितले, ‘फील्ड ऑफ व्ह्यू खूप अरुंद होते, त्यामुळे शॉट जुळवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागले.
पॅराशूट सुरक्षितपणे पुन्हा पॅक करण्यासाठी जास्त वेळ लागला असता, त्यामुळे आमच्याकडे उडीसाठी फक्त एकच संधी होती.’ मॅककार्थीने सांगितले की, त्यांना आलेली सर्वात मोठी अडचण म्हणजे त्यांनी वापरलेले विमान आकाशात ट्रॅक करणे, हे त्यांना वाटले त्यापेक्षा अधिक कठीण होते. ‘सूर्य कॅप्चर करणे मला चांगलेच परिचित आहे; पण यामध्ये नवीन आव्हाने जोडली गेली,’ असे त्याने स्पष्ट केले.