.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क :
जगातील बऱीच शहरे खास कारणासाठी प्रसिद्ध असतात. त्यांच्या खास वैशिष्ट्यांसह ते जगभर ओळखळी जातात. भारतातील अस एक शहर आहे, जे जगातील पहिले शाकाहारी शहर ठरले आहे. हे शहर गुजरातमधील भावनानगर जिल्ह्यातील पालितान शहर आहे.
गुजरातमधील भावनानगर जिल्ह्यापासून ५५ किलोमीटर असलेल्या पालितान शहरात जर प्राण्यांची हत्या, मांस विक्री आणि सेवन करणे बेकायदेशीर केले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे पालितान शहर जगातील पहिले शाकाहरी शहर बनले आहे. जर कोणी आढळले तरत्याला दंड केला जाणार आहे.
शहरातील २०० जैन भिक्षूंनी शहरातील सुमारे २५० मटण विक्री दुकाने बंद करण्याची मागणी करत आंदोलन केले. या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला.
गुजरातमधील शाकाहारावर मुख्यत्वे वैष्णव हिंदू संस्कृतीचा प्रभाव आहे. गुजरातच्या लोकसंख्येच्या 88.5% हिंदू आहेत, जैन सुमारे 1% आणि मुस्लिम आणि ख्रिश्चन सुमारे 10% आहेत. वैष्णव ही राज्यातील प्रमुख धार्मिक संस्कृती आहे.मांसाहाराच्या विरोधकांनी असा युक्तिवाद केला की मांसाच्या प्रदर्शनामुळे त्यांची संवेदनशीलता दुखावते आणि लोकांवर, विशेषतः लहान मुलांवर नकारात्मक परिणाम होतो.