

Switzerland New Year Blast: स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट शहर क्रेन्स-मॉन्टाना (Crans-Montana) येथे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या स्फोटात अनेक लोकांचा जीव गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना स्थानिक वेळेनुसार रात्री १ वाजून ३० मिनिटांनी घडली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितले की स्वित्झर्लंडच्या क्रान्स मोंटाना स्की रिसॉर्टमध्ये असलेल्या बारमध्ये एक स्फोट झाला. या स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाला असून अनेक लोकं जखमी झाली आहे. पोलिसांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार हा स्फोट स्थानिक वेळेनुसार रात्री १ वाजून ३० मिनिटांनी लॉ कॉन्स्टेलेशन बारमध्ये झाला.
पोलिसांनी सांगितले की या स्फोटातील पीडित कुटुंबियांसाठी एक हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या व्हिडिओची अजून पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यात या बारमध्ये नव्या वर्षाचे स्वागत करण्यात येत होते.
फटाक्यांमुळे झाला स्फोट? स्विस न्यूज आऊटलेट ब्लिंकने दिलेल्या माहितीनुसार या बारमध्ये आग लागण्याचं कारण हे एका संगिताच्या कार्यक्रमावेळी झालेली आतशबाजी असू शकते. मात्र असं असलं तरी पोलिसांनी या घटनेचे कारण अजून अस्पष्ट असल्याचं म्हटलं आहे.
ब्लिकने दिलेल्या माहितीनुसार ले कॉन्स्टेलेशन बारमध्ये स्फोट झाला आहे. इथं लोकं नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी जमले होते. पोलीस प्रवक्ता गॅटन लॅथियन यांनी सांगितलं की त्यांना या भागात आग लागल्याची माहिती रात्री १ वाजून ३० मिनिटांनी मिळाली. सकाळपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.