

New Year Rule Change BEE New Rating: नव्या वर्षाची सुरूवात ही महागाईच्या झटक्याने होणार आहे. ब्युरो ऑफ अनर्जी एफिसिएन्सीचे (BEE) स्टार रेटिंग नियम आजपासून कडक होणार आहेत. त्यामुळे यात नवीन ५ स्टार एसी, फ्रीज आणि इतर कुलिंग उपकरणांच्या किंमतीत वाढ होणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार १ जानेवारी २०२६ पासून BEE चे स्टार रेटिंगचे नवे नियम लागू होणार आहेत.
नव्या BEE स्टार रेटिंगच्या नव्या नियमांमुळे एसी आणि फ्रीजच्या किंमतीत जवळपास ५ ते १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावर पडणार आहे.
जीएसटीने दिलासा मात्र...
गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात जीएसटी दरामध्ये घट करण्यात आली होती. त्यावेळी एसीचे दर १० टक्क्यांनी कमी झाले होते. त्यामुळे ग्राहकांना हो मोठा दिलासा होता. मात्र आता काही महिन्यातच BEE ने नवे नियम लागू केल्यामुळं एसी अन् फ्रीज यांच्या किंमती पुन्हा मूळ ठिकाणी आल्या आहेत.
एसी, फ्रीज अन् टीव्ही किंवा वॉशिंग मशीनवर स्टार रेटिंग सिस्टम तुम्ही पाहिली असेल. ५ स्टार रेटिंग सिस्टम ही कोणतीही इलेक्ट्रिकल वस्तू किती वीज वापरते हे सांगते. १ स्टार असलेली इलेक्ट्रिक वस्तू ही जास्त वीज खाते तर ५ स्टार रेटिंग असलेली इलेक्ट्रिकल वस्तू ही कमी वीज खाते.
बीईई चे नव्या एनर्जी एफिशियन्सी नियम लागू होणार आहे.
डॉलरच्या तुलनेत रूपया कमकुवत होत आहे.
तांबे आणि इतर कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या आहेत.
नव्या कडक नियमांमुळे वीजेचं बील कमी येणार आहे.
नव्या BEE रेटिंगच्या नियमांमुळे आता ग्राहकांना अधिक चांगले पॉवर सेव्हिंग पहावयास मिळणार आहे. आता नव्या ५ स्टार रेटिंग एसी जुन्या ५ स्टार रेटिंग एसीच्या तुलनेत जास्त वीज वाचवून देणार आहे. २०२५ मध्ये जी उपकरणे ५ स्टार होती ती आता २०२६ मध्ये ४ स्टार मानली जाणार आहेत.