स्पेसएक्सच्या ‘ड्रॅगन’ने परतणार सुनीता विल्यम्स

अंतराळातील मुक्काम फेब्रुवारी 2025 पर्यंत; नासाची माहिती
 Sunita Williams
सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातील मुक्काम फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे.
Published on
Updated on
अनिल टाकळकर

ह्युस्टन : मूळ भारतीय असलेल्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर फेब्रुवारी 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परततील, असे अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या व्यावसायिक क्रू कार्यक्रमाचे व्यवस्थापक स्टीव्ह स्टिच यांनी सांगितले.

दोन्ही अंतराळवीरांना बोईंगच्या नवीन स्टारलायनर कॅप्सूलमधून पृथ्वीवर आणण्याचे घाटत होते; पण तसे करणे धोकादायक ठरू शकते हे नासाने अखेर मान्य केले आहे. दोन्ही अंतराळवीरांना 5 जून रोजी एकाच अंतराळ यानाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्यात आले होते. स्टारलायनर कॅप्सूलचे हे पहिले वहिले उड्डाण होते. एलन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून फेब्रुवारी 2025 मध्ये सुनीता आणि विल्मोर पृथ्वीवर परततील. म्हणजेच आणखी 7 महिने दोघांना अंतराळ स्थानकावर काढावे लागणार आहेत. स्टारलायनर कॅप्सूल याचवेळी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळे होईल आणि एक किंवा दोन आठवड्यात ऑटोपायलट मोडवर पृथ्वीवर परतण्याचा प्रयत्न करेल. सुनीता आणि विल्मोर यांना परत आणण्याची जबाबदारी ऐनवेळी आल्याने मस्क यांच्या यानातून पूर्वी ठरल्याप्रमाणे चार नव्हे तर दोनच अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जातील. नासाच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सुनीता आणि विल्मोर 13 जून रोजी पृथ्वीवर परतणार होते. पण यानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचा अंतराळ स्थानकावरील मुक्काम वाढला.

 Sunita Williams
Sunita Williams | सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातील मुक्काम वाढणार

स्पेस एक्स, बोईंगला कंत्राट

‘नासा’ने अंतराळवीर अवकाश मोहिमेवर नेण्यासाठी खासगी कंपनीची मदत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांना आणखी दोन यान हवे होते. त्यांनी हे यान तयार करण्यासाठी पहिले कंत्राट स्पेस एक्सला दिले. त्यासाठी 2. 6 अब्ज डॉलर्स या कंपनीला देण्यात आले. दुसरे कंत्राट बोईंगला मिळाले. त्यासाठी स्पेस एक्सच्या तुलनेत त्यांना मोठी म्हणजे 4.2 अब्ज डॉलर्सची रक्कम दिली गेली.

आपण या गावातून त्या गावाला जातो, त्यातही धोका असतोच. अंतराळ प्रवास नक्कीच धोकादायक आहे. नेमक्या क्षणी तुमचे सुरक्षिततेचे सर्व दावे फोल ठरू शकतात.
बिल नेल्सन, नासा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news