Suman Khulbe Indian-origin physician :
भारतीय वंशाच्या डॉक्टर सुमन खुल्बे यांचं कॅनडामधील मेडिकल लायसन्स रद्द करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अनेक पेशंट्सचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. डॉक्टर सुमन यांचे एक नाही त दोन पेशंटसोबत जवळचे संबंध होते. एका पेशंटसोबत त्यांचे शारीरिक संबंध तर दुसऱ्यासोबत जिव्हाळ्याचे जवळचे संबंध असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे या दोन पेशंटसोबत सुमन यांचे व्यावसायिक संबंध देखील असल्याचं देखील उघड झालं आहे. सुमन यांनी आपल्यावरील एका पेशंटचा लैंगिक छळ केल्याचे आरोप मान्य केले आहेत. तर इतर दोघांशी त्यांनी असभ्यपणे वर्तनुक केल्याचं देखील मान्य केलं. याबाबतचं वृत्त कॅनडाच्या नॅशनल पोस्टनं दिलं आहे.
डॉक्टर सुमन यांची चौकशी करणाऱ्या समितीनं सुमन यांनी त्यांच्या रूग्णांवर उपचार करताना त्यांच्याकडे फक्त रूग्ण म्हणून पाहिलं नाही असा निष्कर्ष काढला. समितीच्या म्हणण्यानुसार, 'सुमन यांनी त्यांच्या रूग्णांकडे मित्र आणि व्यावसायिक पार्टनर म्हणून पाहिलं.' समिती पुढे म्हणाली की, कॉलेज ऑफ फिजिशियन आणि सर्जन ऑफ आँतारिओ हे डॉक्टर आणि रूग्ण यांच्यातील लैंगिक संबंधाबाबत कडक धोरण अवलंबतात. जरी हे संबंध परस्पर सहमतीने झाले असले तरी त्याबाबत कडक भूमिकेतूनच पाहिलं जातं.
समितीने याबाबत निर्णय देताना म्हटलं की, 'एका रूग्णासोबत लैंगिक संबंध आणि दुसऱ्या रूग्णांसोबत घनिष्ठ वैयक्तिक नातं. यापैकी दोन रूगणांसोबत सुमन यांचे व्यावसायिक संबंध देखील होते.' दरम्यान, सुमन या निर्णयाविरूद्ध दाद मागण्याचा विचार करत आहेत असं वृत्त नॅशनल पोस्टनं दिलं आहे.
याबाबत डॉ. सुमन नॅशनल पोस्टशी बोलताना म्हणाल्या, 'माझ्या प्रकरणातील अनेक तथ्य वगळण्यात आली आहेत. सार्वजनिक सुनावणीवेळी ही तथ्य पुढं ठेवण्यात आली नाहीत. या सुनावणीमुळं मला माझ्या कुटुंबियांना अनेक आर्थिक आणि वैयक्तिक त्याग करावे लागलेत.' सुमन म्हणाल्या की मी पारंपरिक मुल्य जपणाऱ्या भारतीय घरात वाढलेली आहे. सुमन यांनी त्यांचे ट्रेनरसोबत लैंगिक संबंध असल्याचे मान्य केलं. मात्र त्यांनी याला रिलेशनशिप असं संबोधलं आहे.
डॉक्टर सुमन यांनी २००१ मध्ये फॅमिली फिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करण्यास सुरूवात केली. त्यांनी कनाटामध्ये घर देखील खरेदी केलं. त्यानंतर त्यांनी आपल्या घराचं रूपांतर हे क्लिनिकमध्ये केलं. त्यानंतर त्या २०१५ मध्ये स्थानिक जीमशी जोडल्या गेल्या. याच जीम ट्रेनरमधील ट्रेनर नंतर डॉक्टर सुमन यांचा रूग्ण झाला. त्यानं आधी व्हिटॅमीन थेअरपी घेतली त्यानंतर त्यांनी मसल रिकव्हरी थेअरपी देखील घेतली.
न्यायालयातील कागदपत्रानुसार सुमन यांनी या थेअरपीवेळी ओरल सेक्स, किसिंग आणि मॅन्युअल स्टिम्युलेशन ही लैंगिक कृत्य केली. यावेळी प्रोकेन ड्रग्जचा देखील वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.