Canada Temporary Residents : कॅनडाचा भारतीय विद्यार्थ्यांना धक्का; पंतप्रधानांची मोठी घोषणा

अँटी इमिग्रंट प्रोटेस्टमुळं कॅनडा सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, भारतीय विद्यार्थ्यांना मोठा धक्का
Canada Temporary Residents
Canada Temporary Residents Canva Image
Published on
Updated on

Canada Temporary Residents :

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने यांनी त्यांच सरकार २०२७ पर्यंत तात्पुरत्या नागरिकांची संख्या ही ५ टक्क्याच्या खाली आणणार अशी घोषणा केली आहे. यात विदेशातील विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. पीआयई या आंतरराष्ट्रीय शिक्षण प्लॅटफॉर्मनं दिलेल्या अहवालानुसार २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत कॅनडाकडून भारतीय विद्यार्थ्यांवर याचा खूप मोठा परिणाम झाला आहे. जवळपास पाच पैकी चार विद्यार्थ्यांना रिजेक्शन होत आहेत.

दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान कार्ने हे एडमोंटन इथं बोलताना म्हणाले की, कॅनडा सरकार हे स्थलांतरित नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी करणार आहे. यात तात्पुरते कामगार आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. त्यांनी २०२७ पर्यंत ही संध्या ५ टक्क्याच्या देखील खाली आणण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे. गेल्या वर्षी ही संख्या ७.२५ टक्के इतकी होती.

Canada Temporary Residents
Dallas: वॉशिंग मशीनच्या वादातून अमेरिकेत भारतीय व्यक्तीची निर्घृण हत्या; पत्नी आणि मुलासमोर केला शिरच्छेद

कॅनडाचे पंतप्रधान कार्ने म्हणाले, 'आम्ही आमच्या देशात नागरिकांचे स्वागत करतो. मात्र आम्हाला या लोकांचे स्वागत करण्याची क्षमता आमच्याकडे आहे का हे देखील पहावं लागेल.' पंतप्रधान कार्ने नवीन इमिग्रेशन प्लॅन हा आढवड्याभरात संसदेसमोर ठेवण्याची शक्यता आहे.

दरम्यान पीआयईने दिलेल्या माहितीनुसार या वर्षात जानेवारी ते जुलै या महिन्यांमध्ये कॅनडात स्टडी पर्मिट अॅप्लिकेशनमध्ये ६२ टक्क्यांची घट झाली आहे. हाच दर गेल्या दशकात ६० टक्क्यांच्या आसापास होता. तो आता ३८ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. ही २०२४ च्या आकडेवारीपेक्षा १० टक्क्यांनी कमी आहे.

हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार कॅनडीयन इन्स्टिट्यूटमध्ये भारतीय विद्यार्थांना मिळालेला स्टडी पर्मिटची संख्या ही दोन तृतिांशने कमी आली आहे. स्थलांतरितांच्या बाबतच्या आकडेवारीनुसार भारतीयांना इश्यू करण्यात आलेल्या परमीटची संख्या ही एप्रिल आणि जून २०२५ दरम्यान, १७ हाजर ८८५ इतकी होती. हीच आकडेवारी २०२४ मध्ये ५५ हजार ६६० इतकी होती. यामध्ये जवळपास ६६ टक्क्यांची घट झाली आहे.

Canada Temporary Residents
Donald Trump | ट्रम्प यांची पत घसरली; अप्रूव्हल रेटिंग 50 टक्क्यांच्या खाली

२०२५ च्या पहिल्या सहा महिन्यात देखील भारतीय विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या स्टडी पर्मिटची संख्या ही ९९ हजार ९५० वरून फक्त ४७ हजार ६९६ इतकी खाली आली आहे. एकूण स्टडी पर्मिटची संख्या ही २ लाख ४५ हजार ०५५ पासून जवळपास १ लाखापर्यंत खाली आली आहे.

२०२४ मध्ये स्टडी पर्मिटची संख्या कमी होण्याचा ट्रेंड हा २०२४ मध्ये देखील सुरू होता. कॅनडाने स्टडी पर्मिट्सची संख्या कमी करण्यास सुरूवात केली आहे.

आयआरसीसीने प्राथमिक अंदाजानुसार दिलेली आकडेवारी बदलू शकते. मात्र कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थी विशेष करून भारतीय विद्यार्थ्यांना स्टडी पर्मिट देण्याची संख्या ही कमी झाली आहे. राजकीय अभ्यासकांनुसार याला कॅनडामध्ये सुरू असलेल्या अँटी इमिग्रंट चळवळीची मोठी पार्श्वभूमी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news