Sri Lanka Easter bombings : २७९ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्‍या' बॉम्बस्फोटांमागे श्रीलंकेचा तत्‍कालिन 'गुप्तहेर प्रमुखच'!

श्रीलंका सरकारची संसदेत माहिती : इस्लामिक कट्टरपंथीयांशी संगनमत करून रचला होता कट
Sri Lanka Easter bombings
श्रीलंकेमध्ये २०१९ मधील ईस्टर संडे दहशतवादी हल्ल्यात २७९ जणांचा बळी गेला होता.Pudhari
Published on
Updated on

Sri Lanka Easter bombings : श्रीलंकेमध्ये २०१९ मधील ईस्टर संडे दहशतवादी हल्ल्याचा कट देशाच्या माजी गुप्तहेर प्रमुखानेच रचला होता. या बॉम्बस्फोटात २७९ जणांचा बळी गेला होता. या बॉम्बस्फोटांशी माजी गुप्तहेर प्रमुखाचा थेट संबंध जोडणारे श्रीलंका सरकारचे हे पहिलेच अधिकृत विधान असल्याने याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

श्रीलंकेच्या इतिहासातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला

मंत्री आनंद विजेपाला यांनी सांगितले की, मेजर जनरल तुआन सुरेश साले (Suresh Sallay) यांना या हल्ल्यात "मदत आणि चिथावणी" दिल्याचा आरोपावरून फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. त्यांनीच हल्ल्यासाठी एका कॅथोलिक चर्चची निवड केली होती. नागरिकांवर झालेला श्रीलंकेतील हा आतापर्यंतचा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला होता. यामध्ये राजधानीतील तीन आलिशान हॉटेल्स, कोलंबोबाहेरील दोन रोमन कॅथोलिक चर्च आणि एका इव्हँजेलिकल प्रोटेस्टंट चर्चला लक्ष्य करण्यात आले होते.

Sri Lanka Easter bombings
Mamata Banerjee Political Career: आव्हानांच्या गर्तेत ममतादीदी

तुआन याने केले होते इस्लामिक कट्टरपंथीयांशी संगनमत

मंत्री विजेपाला म्हणाले, "तपासातून असे समोर आले आहे की, निवृत्त मेजर जनरल तुआन सुरेश साले यांनी इस्लामिक कट्टरपंथीयांशी संगनमत केले होते. प्रत्यक्षात हल्ला होईपर्यंत मार्गदर्शन केले होते. या भीषण बॉम्बस्फोटाच्या अवघ्या तीन आठवडे आधी, साले यांनी संबंधित ठिकाणाची आणि तिथल्या गर्दीची माहिती गोळा करण्यासाठी काही मुस्लिम व्यक्तींची भेट घेतली होती," असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Sri Lanka Easter bombings
Falta Election Result |फाल्टाच्या 'पुष्पा'ला मतदारांनी झुकवले! अभिषेक बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात भाजपचा विजय

विरोधी पक्षाकडून सालेची पाठराखण

विजेपाला यांनी माहिती दिली की, दहशतवाद प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PTA) कोठडीत असलेल्या साले यांनी अन्नत्याग आंदोलन (उपोषण) सुरू केले होते. त्यानंतर प्रकृती खालावल्याने रविवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, विरोधी पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या सुटकेची मागणी करत राजधानीत निदर्शने करत आहेत. साले यांच्या चौकशीनंतर, तपास अधिकाऱ्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना देश सोडण्यास बंदी घालणारे न्यायालयाचे आदेश मिळवले आहेत.

राजपक्षे यांच्या राजवटीत साले झाले देशाचे गुप्तहेर प्रमुख

२०१९ मध्ये राजपक्षे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर लगेचच साले यांची देशाची मुख्य गुप्तहेर संस्था 'स्टेट इंटेलिजन्स सर्व्हिस' (SIS) च्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. 'एसआयएस'चे प्रमुख होण्यापूर्वी त्यांनी लष्करी गुप्तहेर विभागाचेही नेतृत्व केले होते.

Sri Lanka Easter bombings
West Bengal Politics : बांगला देश सीमेवर कुंपणासाठी ‌‘BSF’ला जमीन देणार : मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी सरकारचा पहिलाच निर्णय

ब्रिटनमधील वृत्तवाहिनीने २०२३ मध्‍ये केला होता प्रथम खुलासा

ब्रिटिश वृत्तवाहिनी 'चॅनल ४' ने २०२३ मध्ये एका रिपोर्टमध्ये दावा केला होता की, सुरेश साले यांचे आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या इस्लामिक कट्टरपंथीयांशी संबंध होते आणि हल्ल्यापूर्वी त्यांनी त्यांची भेटही घेतली होती. नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर माहितगाराने चॅनल ४ ला सांगितले होते की, त्यावर्षीच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत गोटाबाया राजपक्षे यांच्या बाजूने वातावरण तयार व्हावे, या उद्देशाने साले यांनी हा हल्ला होऊ दिला होता.या बॉम्बस्फोटांनंतर अवघ्या दोन दिवसांनी राजपक्षे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर इस्लामिक कट्टरतावादाचा बिमोड करण्याचे आश्वासन देत नोव्हेंबरमधील निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवला होता. सध्या गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) राजपक्षे यांना थेट संशयित म्हणून नामनिर्देशित केलेले नाही, परंतु अधिकृत सूत्रांनुसार लवकरच त्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news