SpaceX Rocket Crash Moon : 'स्पेसएक्स'चे भरकटलेले रॉकेट चंद्रावर आदळणार; भीषण स्फोटानंतर उठणार १०० किमी उंच धुळीचे लोट!

5 ऑगस्‍ट रोजीच्‍या दुर्मिळ घटनेचा साक्षीदार होण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ उत्सुक
SpaceX Rocket Crash Moon
SpaceX Rocket Crash Moon : प्रतिकात्‍मक छायाचित्र. Pudhari
Published on
Updated on

SpaceX Rocket Crash Moon : एलन मस्‍क यांच्या 'स्पेसएक्स' (SpaceX) कंपनीचे एक भरकटलेले रॉकेट वेगाने चंद्राच्या दिशेने झेपावत आहे. ते लवकरच चंद्रावर आदळणार आहे. हे 'स्पेसएक्स'च्या 'फाल्कन ९' (Falcon 9) रॉकेटचा वरचा भाग असून, जानेवारी २०२५ मध्ये दोन 'लूनर लँडर्स'सह त्याचे उड्डाण करण्यात आले होते. बुधवार, ५ ऑगस्‍ट २०२६ रोजी हे रॉकेट प्रचंड वेगाने चंद्राच्या पृष्ठभागावर धडकणार आहे. या भीषण टक्करीमुळे चंद्रावर धुळीचे महाकाय लोट उठणार असून, या दुर्मीळ घटनेचा साक्षीदार होण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ उत्सुक आहेत.

८,७०० किमी प्रतितास वेगाने चंद्रावर होणार धडक

वृत्तसंस्‍था 'एपी'ने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेबाबत अंतराळ अभ्यासक बिल ग्रे यांनी सांगितले की, ही धडक तब्बल ८,७०० किमी प्रतितास या अद्भूत वेगाने होईल. हा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा सात पटीने अधिक आहे. चंद्राच्या सूर्यप्रकाश असलेल्या पश्चिमेकडील भागातील 'आइंस्टाइन क्रेटर'जवळ ही धडक होईल. अमेरिकेच्या वेळेनुसार ही घटना भल्या पहाटे घडणार आहे. त्यामुळे अमेरिका आणि कॅनडाच्या पूर्व भागातून, तसेच दक्षिण अमेरिकेतील बहुतांश भागांतून हा थरार पाहता येणार आहे.

SpaceX Rocket Crash Moon
Starlink in India | मोबाईल टॉवर्स होणार इतिहास जमा..! एलन मस्‍क यांची 'स्टारलिंक' भारतात सुरु करणार 'डायरेक्ट-टू-सेल' सेवा

पृथ्वीवरून दिसणार धुळीचे लोट!

'arXiv' या ओपन-सोर्स सर्व्हरवर प्रकाशित आंतरराष्ट्रीय टीमच्या अभ्यासानुसार, या टक्करीमुळे निर्माण होणारा धुळीचा लोट इतका चमकदार असेल की, चंद्राच्या काठाजवळ अंधाऱ्या आकाशात तो स्पष्टपणे दिसून येईल. अत्याधुनिक दुर्बीण (Sensitive Telescope) असणारे हौशी खगोलप्रेमीही हा नजारा पृथ्‍वीवरुन पाहू शकतील.

१०० किलोमीटर उंच उठणार लोट!

ही धडक चंद्राच्या सामोरील बाजूला होणार असून, त्यातून ३ टन टीएनटी स्फोटाएवढी प्रचंड ऊर्जा निर्माण होईल. तज्ज्ञांच्या मते, टक्करीचा लखलखाट अवघ्या एका सेकंदापेक्षा कमी वेळेचा असेल; मात्र, त्यातून उडालेला ढिगारा अनेक किलोमीटरपर्यंत पसरून दुर्बिणीद्वारे काही मिनिटांपर्यंत पाहायला मिळू शकेल. या धडकीमुळे उडालेल्या मलब्याचा लोट ७५ ते १०० किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 'टॅक्सस युनिव्हर्सिटी'चे संशोधन सहयोगी विल्यम जो यांनी 'स्पेस डॉट कॉम'शी बोलताना सांगितले की, धडकीनंतरच्या सुरुवातीच्या काही मिनिटांत हा धुळीचा लोट अंधाऱ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर कित्येक पटीने अधिक चमकदार दिसेल.

SpaceX Rocket Crash Moon
NASA UFO Photos | ‘नासा’कडे आहेत यूएफओचे फोटो

चंद्रावरील दुसरीच दुर्घटना

'स्पेस-एक्स'चा हे रॉकेट चंद्रावर धडकावण्याचा कोणताही उद्देश नव्हता. अंतराळ तज्ज्ञांच्या मते, रॉकेटचा वरचा भाग सूर्याच्या कक्षेत ढकलला गेला असता, तर ही टक्कर टळली असती. मात्र आता अनावधानाने किंवा चुकीमुळे रॉकेट चंद्रावर आदळण्याची ही दुसरीच वेळ आहे. यापूर्वी २०२२ मध्ये चीनच्या एका रॉकेटच्या भागाची चंद्राच्या दुसऱ्या बाजूला धडक झाली होती, ज्यामुळे तिथे दोन मोठे खड्डे पडले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news