Shubhanshu Shukla Axiom-4 Mission : शुभांशू शुक्लांना घेऊन 'अ‍ॅक्सिओम ४' अंतराळात झेपावले

Axiom-4 Space Launch Live Update : राकेश शर्मानंतर अंतराळ मोहिमेवर जाणारा शुभांशु शुक्ला हा पहिला भारतीय आहे. अ‍ॅक्सिओम मिशन ४ (अ‍ॅक्स-४) अंतर्गत स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटने ड्रॅगन अंतराळयानासह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) उड्डाण केले.
Shubhanshu Shukla Axiom-4 Mission
Shubhanshu Shukla Axiom-4 Missionpudhari photo
Published on
Updated on

फ्लोरिडा : भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि इस्रोचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी आज यशस्वीरित्या अवकाशात झेप घेत इतिहास रचला आहे. ४१ वर्षांपूर्वी राकेश शर्मा यांनी केलेल्या ऐतिहासिक अंतराळ प्रवासानंतर, अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय ठरले आहेत. अनेक तांत्रिक अडचणींवर मात करत, भारतीय वेळेनुसार आज दुपारी १२ वाजून १ मिनिटांनी अ‍ॅक्सिओम मिशन ४ (अ‍ॅक्स-४) अंतर्गत स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटने ड्रॅगन अंतराळयानासह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे (ISS) उड्डाण केले.

अ‍ॅक्सिओम-४ (Axiom-4) नावाच्या या मोहिमेत शुभांशू शुक्ला मिशन पायलट म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्यासोबत अमेरिकेच्या अनुभवी अंतराळवीर कमांडर पेगी व्हिटसन, पोलंडचे स्लावोज उज्नास्की-विस्नीव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे मिशन विशेषज्ञ म्हणून सहभागी झाले आहेत. ही मोहीम अ‍ॅक्सिओम स्पेस या खासगी कंपनीद्वारे आयोजित करण्यात आली आहे, जिचे उद्दिष्ट अंतराळ प्रवास सर्वांसाठी खुला करणे आहे.

आईचे डोळे पाणावले, प्रार्थनेसाठी हात जोडले

शुभांशू शुक्ला यांचे अंतराळयान अवकाशात झेपावल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या त्याच्या आई आशा शुक्ला यांचे डोळ पाणावले. त्यांनी मुलाच्या सुखरूप प्रवासासाठी हात जोडले.

१४ दिवसांची वैज्ञानिक मोहीम

शुक्ला आणि त्यांचे सहकारी १४ दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहणार आहेत. या काळात ते अनेक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक प्रयोगांमध्ये भाग घेतील. इस्रोने खास शुक्ला यांच्यासाठी तयार केलेले सात प्रयोग ते करणार आहेत, ज्यामध्ये सूक्ष्म-गुरुत्वाकर्षणाच्या स्थितीत मेथी आणि मुगाला अंकुरित करण्यासारख्या प्रयोगांचा समावेश आहे. याशिवाय ते नासाच्या पाच संयुक्त अभ्यासांमध्येही सहभागी होतील.

गगनयानला होणार शुभांशु यांच्या या प्रवासाचा फायदा

अक्सिओम मिशन-४ वरील शुक्ला यांच्या अनुभवाचा इस्रोच्या गगनयान अंतराळ उड्डाण मोहिमेत खूप चांगला उपयोग केला जाईल. इस्रो अक्सिओम-४ मोहिमेवर ५५० कोटी रुपये खर्च करत आहे.

शुभांशूची बहीण काय म्हणाली?

हा संपूर्ण देशासाठी खरोखर अभिमानाचा क्षण आहे. मी त्याची बहीण आहे म्हणून खूप आनंद, खूप प्रेम आहेच पण चिंता ही आहे. काहीही झाले तरी चांगलेच होईल, मला खात्री आहे, आम्हाला खात्री आहे की तो त्याचे ध्येय यशस्वीरित्या आणि सुरक्षितपणे पूर्ण करेल. शुभांशू आपल्या सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा बनला आहे.

शुची मिश्रा (शुभांशू शुक्ला यांची बहीण)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news