Malaria Vaccine : सिरम इन्स्टिट्यूटची मलेरिया प्रतिबंधक लस आफ्रिकेत लाँच

WHO कडून गेल्यावर्षी मिळाली होती मान्यता
malaria vaccine
सिरम इन्स्टिट्यूटची मलेरिया प्रतिबंधक लस आफ्रिकेत लाँचfile photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी संयुक्तपणे विकसित केलेली नवीन उच्च दर्जाची मलेरिया लस सोमवारी (दि. १५) अधिकृतपणे लाँच करण्यात आली. पश्चिम आफ्रिकेत 'R21/Matrix-M' लस वापरण्यास सुरुवात करणारा कोट डी'आयव्होर हा पहिला देश बनला आहे. गेल्या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) या लसीला मान्यता मिळाली होती.

'मलेरिया नियंत्रणात नव्या युगाची सुरुवात'

ऑक्सफर्ड विद्यापीठातील जेनर इन्स्टिट्यूटचे संचालक प्रोफेसर एड्रियन हिल यांनी सांगितले की, 'R21/Matrix-M मलेरिया लसीचा रोल-आउट मलेरिया नियंत्रणात एका नवीन युगाची सुरुवात आहे. उच्च प्रभावी लस आता नाममात्र किंमतीत अनेक देशांमध्ये उपलब्ध होणार आहे. आम्हाला आशा आहे की, ही लस लवकरच सर्व आफ्रिकन देशांना प्रदान केली जाईल.' नोव्हावॅक्सचे अध्यक्ष आणि सीईओ जॉन जेकब्स म्हणाले, "कोटे डी'आयव्होअरमध्ये R21/Matrix-M™ मलेरिया लस लाँच करणे ही मृत्यूच्या प्रमुख कारणांपासून असुरक्षित मुलांचे संरक्षण करण्याच्या लढ्यात एक मोठे यश आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य सुधारणाऱ्या नाविन्यपूर्ण लसी तयार करण्याचे आमचे ध्येय देखील बळकट होते."

malaria vaccine
Corona Test : कोरोना चाचणीसाठी तरूणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब, आरोपीला १० वर्षाची शिक्षा

'दरवर्षी १० कोटी डोस तयार करण्यास वचनबद्ध'

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला म्हणाले की, "मलेरियाचे ओझे कमी करणे अखेर शक्य झाले आहे. ऑक्सफर्ड आणि नोव्हावॅक्समधील भागीदारांसोबतच्या अतुलनीय कामानंतर आजचे R21/Matrix-M लस लाँच करणे हा एक मैलाचा दगड आहे. आमचा विश्वास आहे की, सर्वांना परवडणारी आणि आवश्यक रोग प्रतिबंधक सुविधा मिळणे हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. म्हणूनच आम्ही आर २१ चे १० कोटी डोस तयार करण्यासाठी वचनबद्ध आहोत. यामुळे लाखो लोकांचे संरक्षण होईल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी या घातक रोगाचा भार कमी करेल. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची दरवर्षी १० कोटी डोस विकसित करण्याची क्षमता असून आत्तापर्यंत २५ दशलक्ष डोस तयार केले आहेत.

कोटे डी'आयव्होरमध्ये मुलांना प्रथम लसीकरण

लसीचे एकूण ६ लाख ५६ हजार ६०० डोस प्राप्त झाले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात ही लस कोटे डी'आयव्होरमधील ० ते २३ महिने वयोगटातील २ लाख ५० हजार मुलांना दिली जाईल. R21/Matrix-M लस घाना, नायजेरिया, बुर्किना फासो आणि मध्य आफ्रिकन रिपब्लिक यांनी देखील अधिकृत केली आहे. R21 ही उप-सहारा आफ्रिकेत RTS,S नंतर उपलब्ध असलेली दुसरी मलेरियाची लस आहे. मलेरिया लसीमुळे दरवर्षी हजारो तरुणांचे जीव वाचतील अशी अपेक्षा आहे. २०२४ मध्ये १५ आफ्रिकन देशांमध्ये मलेरियावरील लस लाँच होण्याची अपेक्षा आहे. या देशांनी २ वर्षात सुमारे ६.६ दशलक्ष मुलांना मलेरियाची लस देण्याची योजना आखली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news