Saudi Arabia Death Sentence: मशिदीत चुंबन घेतल्याने जोडप्याला दिली फाशीची शिक्षा; सौदी अरेबियात धक्कादायक निर्णय

मशिदीत कथित अश्लील कृत्य केल्याप्रकरणी दोन बांगलादेशी नागरिकांना गुप्तपणे फाशीची शिक्षा देण्यात आली. मात्र, कोणतीही माहिती न देता आपल्या नागरिकांना शिक्षा दिल्याने बांगलादेश सरकारने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Saudi Arabia
Saudi ArabiaFile Photo
Published on: 
Updated on: 

Saudi Arabia Death Sentence

नवी दिल्ली: सौदी अरेबियातील एका मशिदीत कथित अश्लील कृत्य (चुंबन घेत असल्याचा आरोप) केल्याप्रकरणी दोन बांगलादेशी नागरिकांना गुप्तपणे फाशीची शिक्षा देण्यात आली. या घटनेमुळे बांगलादेश आणि सौदी अरेबिया दरम्यान मोठा आंतरराष्ट्रीय आणि राजनैतिक वाद निर्माण झाला आहे.

सौदीच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी नजरुल इस्लाम अब्दुल बासिर आणि सिती अख्तर या दोन बांगलादेशी नागरिकांना फाशी देण्यात आली. मात्र, त्यांनी नेमके कोणते अश्लील कृत्य केले होते, याची अधिकृत माहिती सौदी प्रशासनाने सार्वजनिक केलेली नाही.

दरम्यान, मशिदीत एकमेकांचे चुंबन घेतल्याच्या आरोपावरूनच दोघांना फाशी दिल्याचे दावे सौदीतील प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर केले जात आहेत. मात्र, स्पष्ट अधिकृत विधानाच्या अभावामुळे अनेक कायदेतज्ज्ञांनी हे दावे केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. इस्लामिक कायद्यातील 'ताझीर' श्रेणीअंतर्गत या दोघांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या कायद्यानुसार, गुन्ह्याचे गांभीर्य पाहून शिक्षेचे स्वरूप ठरवण्याचे अधिकार न्यायाधीशांना असतात. त्यानंतर, संबंधित न्यायिक संस्थांनी या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आणि शाही आदेशाद्वारे अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली.

Saudi Arabia
President Emmanuel Macron | फ्रान्समधील उपद्रवींना किंमत मोजावी लागेल!

बांगलादेश सरकारचा तीव्र संताप; सौदीच्या राजदूतांना समन्स

कोणतीही पूर्वकल्पना न देता आपल्या नागरिकांना फाशीची शिक्षा दिल्यामुळे बांगलादेश सरकारने तीव्र संताप व्यक्त केला आहे. बांगलादेशच्या परराष्ट्र राज्यमंत्री शमा ओबेद इस्लाम यांनी सांगितले की, सौदी प्रशासनाने बांगलादेश सरकारला या शिक्षेबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. माध्यमांतील बातम्यांवरूनच सरकारला ही माहिती मिळाली. याप्रकरणी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ढाका येथील सौदी अरेबियाचे राजदूत अब्दुल्ला झाफर एच बिन अबियाह यांना समन्स बजावून स्पष्टीकरण मागितले असून अधिकृत राजनैतिक पत्र पाठवले आहे.

व्हिएन्ना कराराचे उल्लंघन?

बांगलादेशचे परराष्ट्र राज्यमंत्री हुमायूं कबीर यांनी सौदीच्या या कारवाईला अत्यंत निराशाजनक म्हटले आहे. दोन्ही देश 'व्हिएन्ना कन्व्हेन्शन ऑन कन्सुलर रिलेशन्स' या आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षरी करणारे देश आहेत. या करारानुसार इतर देशांतील नागरिकांच्या अटकेची किंवा मृत्युदंडाची माहिती संबंधित देशाला देणे बंधनकारक असताना सौदी प्रशासनाने ही माहिती का लपवली, असा सवाल बांगलादेशने उपस्थित केला आहे.

मशिदीतील सफाई कामगार होता नजरुल

मिळालेल्या माहितीनुसार, मृत नजरुल इस्लाम हा बांगलादेशातील चट्टग्राम विभागातील ब्राह्मणबारिया जिल्ह्याचा रहिवासी होता. नोव्हेंबर २०२२ मध्ये तो सौदी अरेबियात आला होता आणि मक्केतील मशिदमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होता. सौदीत आल्याच्या आठ महिन्यांनंतरच पोलिसांनी त्याला अटक केली होती आणि तेव्हापासून तो तुरुंगात होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. नजरुलचे वडील अब्दुल बासिर यांनी या खटल्याच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित करत, "जर माझ्या मुलाला विनाकारण मारले गेले असेल, तर मला न्याय हवा आहे," अशी मागणी केली आहे. तसेच आपण मृत सिती अख्तरला ओळखत नसून, ते दोघे विवाहित असल्याचा दावा कुटुंबीयांनी फेटाळून लावला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र टीका

या गुप्त फाशीच्या कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकार कार्यकर्ते आणि कायदेतज्ज्ञांनी सौदी अरेबियाच्या न्यायव्यवस्थेवर कडक शब्दांत टीका केली आहे. व्हिएन्ना कराराच्या कलम ३६ आणि ३७ चा हवाला देत कायदेतज्ज्ञांनी सांगितले की, परदेशी नागरिकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले आणि कौटुंबिक किंवा दूतावासाला कोणतीही माहिती न देता फाशी देण्यात आली. 'ह्युमन राइट्स वॉच' या मानवाधिकार संघटनेच्या अहवालानुसार, सौदी अरेबियाने २०२५ मध्ये तब्बल ३५६ हून अधिक लोकांना फाशीची शिक्षा दिली आहे, ज्यामध्ये बहुतांश परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

Saudi Arabia
Ecuador Priest Death: ‘एक दिवस आपणही मरणार आहोत’; चर्चमध्ये प्रवचन सुरू होतं अन् पाद्रींच्या डोक्यावर कोसळला क्रूस, VIDEO समोर
logo
Pudhari News
pudhari.news