President Emmanuel Macron | फ्रान्समधील उपद्रवींना किंमत मोजावी लागेल!

गृहमंत्र्यांचा राजीनामा फेटाळला
President Emmanuel Macron |
President Emmanuel Macron | फ्रान्समधील उपद्रवींना किंमत मोजावी लागेल!
Published on: 
Updated on: 

पॅरिस; वृत्तसंस्था : फ्रान्समध्ये १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचार, तोडफोड आणि लुटमारीच्या घटनांनंतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. तोडफोड आणि लूटमार करणाऱ्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल, असे त्यांनी रविवारी रात्री देशाला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले. दरम्यान, त्यांनी गृहमंत्री लॉराँ न्युनेझ यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला असून, रस्त्यांवरील सुरक्षा मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान सेबॅस्तियाँ लेकॉर्न्यू यांनी हिंसाचाराच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी सरकारची तातडीची बैठक बोलावली.

१५०० दुकानांचे नुकसान झाल्याचा दावा

महागाई आणि सरकारी सुविधांमधील कपातीच्या विरोधात शनिवारी आठ लाखांहून अधिक लोक रस्त्यावर उतरल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला आंदोलन शांततेत सुरू होते. मात्र, नंतर चेहरा झाकलेल्या काही आंदोलकांनी तोडफोड आणि लूटमार सुरू केली. सुमारे १५०० दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांना लूटमारीचा किंवा नुकसानीचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आणि जमावावर पाण्याचे फवारे मारले. फ्रान्सच्या गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, या घटनांमध्ये सुमारे एक हजार पोलिस कर्मचारी जखमी झाले असून, त्यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर होती. हिंसाचार रोखण्यासाठी पुरेशी तयारी न केल्याचा आरोप गृहमंत्री न्युनेझ यांच्यावर होत आहे.

फ्रान्सच्या संसदेत प्रमुख राजकीय गटांमध्ये तीव्र मतभेद आहेत. त्यामुळे सरकारला महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत. एप्रिल २०२७ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याने राजकीय वातावरणही तापले आहे. मरीन ले पेन आणि जाँ-ल्यूक मेलांशों यांच्यासारखे नेते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रिय आहेत. कर्ज नियंत्रणात आणण्यासाठी खर्च कमी करण्याचा दबाव असला, तरी सरकारी सुविधा किंवा कल्याणकारी योजनांमध्ये कपात केल्यास जनतेचा असंतोष आणखी वाढण्याची भीती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news