Russia Ukraine War | रशियाचा युक्रेनमधील मुलांच्या हॉस्पिटलवर हल्ला, २० ठार

Russia Ukraine War
रशियाचा युक्रेनमधील मुलांच्या हॉस्पिटलवर हल्ला, २० ठार File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: युक्रेनची राजधानी असलेल्या किव्हमधील एका लहान मुलांच्या हॉस्पिटवर रशियाने क्षेपणास्त्र डागले आहेत. या हल्ल्यात २० लोकांचा बळी गेला आहे. किव्हमध्ये रशियाने केलेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला असल्याचे किव्हचे महापौर विटाली क्लिटच्को यांनी म्हणला आहे.

या हल्ल्याती हॉस्पिटलची इमारत पूर्ण कोसळली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर झेलनेस्की यांनी या ढिगाऱ्याखाली बरेच लोक अडकले असल्याचे म्हटले आहे.

Russia Ukraine War
Russia-Ukraine War : भीषण हल्‍ल्‍यांनी युक्रेन पुन्‍हा हादरला, रशियाने रात्रभर डागली क्षेपणास्‍त्रे, ड्रोन हल्‍लेही

रशियाने जवळपास ४० क्षेपणास्त्रं डागली. किव्ह येथील निवासी इमारती, पायाभूत सुविधा आणि मुलांच्या हॉस्पिटलवर हे हल्ले करण्यात आले, असे झेलनेस्की यांनी म्हटले.

या हॉस्पिटलचे नाव ओखमॅटडिट हॉस्पिटल असे असून या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली किती लोक अडकले आहेत, याची संख्या कळू शकलेली, असे झेलनेस्की यांनी म्हटले आहे.

Russia Ukraine War
Russia Ukraine War : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचे १८ नागरिक ठार

मार्च २०२२मध्ये रशियाने मॅरिपॉल मॅटर्निटी हॉस्पिटलवर हल्ला केला होत, त्यात ३ लोकांचा बळी गेला होता. रशियाने युक्रेनवर विरोधात फेब्रुवारी २०२२मध्ये युद्ध पुकारले होते. गेल्या महिन्यात रशियाने किव्हवर ड्रोनने हल्ला केला होता. दरम्यान युक्रेनने पाश्चात्य राष्ट्रांकडे अधिकची मदत मागितली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news