Russia-Ukraine war | पुतिन यांनी घेतला 'ड्रोन' हल्‍ल्‍याचा बदला! युक्रेनमध्‍ये ५ ठार, २४ जखमी

ट्रम्‍प यांच्‍याबरोबर झालेल्‍या चर्चेत केला होता युक्रेनला प्रत्‍युत्तर देण्‍याचा निर्धार
Russia-Ukraine War - Putin and Zelensky
प्रातिनिधिक छायाचित्र. file Photo
Published on
Updated on

Russia-Ukraine war : 'युक्रेनने आमच्‍यावर केलेल्‍या ड्रोन हल्ल्याचा आम्‍ही बदला घेवू,' असा निर्धार रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांच्‍याशी फाेनवरुन संवाद साधताना व्‍यक्‍त केला हाेता. यानंतर काही तासांमध्‍येच रशियाने युक्रेनच्या उत्तरेकडील प्रिलुकी, चेर्निहिव्ह प्रदेशात ड्रोन हल्ले केले. या हल्‍ल्‍यात ५ जण ठार तर २४ जण जखमी झाल्‍याचे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे.

ड्रोन हल्‍ल्‍याचा बदला घेणारच : पुतिन यांनी व्‍यक्‍त केला होता निर्धार

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी युक्रेन आणि इराणच्या मुद्द्यावर ७५ मिनिटे फोनवरून चर्चा झाली. अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली होती. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी सकारात्‍मक चर्चा झाली; मात्र याचा अर्थ असा नाही की, तात्काळ शांतता निर्माण होईल. रशियामध्ये युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्या बदला घेणार असल्‍याचे पुतिन यांनी सांगितले आहे. तसेच इराणकडे अण्वस्त्र असू शकत नाही यावर आम्ही दोघेही सहमत आहोत. पुतिन यांनी सुचवले की ते इराणशी अण्वस्त्र चर्चेत मदत करू शकतात, असेही ट्रम्‍प म्‍हणाले होते.

Russia-Ukraine War - Putin and Zelensky
Russia-Ukraine war | 'हे काय चाललंय... ही तर रशियाच्या पतनाची सुरुवात ठरेल' : पुतिन यांच्‍यावर ट्रम्‍प भडकले

क्रेनचे उत्तर आणि पूर्वेकडील प्रदेशात रशियचा ड्राेन हल्‍ला ड्रोन

रशियाने बुधवारी रात्रभर केलेल्‍या ड्रोन हल्‍ल्‍यांमध्‍ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्‍यू झाला. रशियाने युक्रेनच्या उत्तरेकडील प्रिलुकी, चेर्निहिव्ह प्रदेशात ड्रोन हल्ले केले. तीन वर्षांहून अधिक काळ सुरु असलेल्‍या युद्धात युक्रेनचे उत्तर आणि पूर्वेकडील प्रदेश रशियन ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे वारंवार लक्ष्य राहिले आहेत.युक्रेनच्या ईशान्येकडील खार्किव शहरावर झालेल्या रशियन ड्रोन हल्ल्यात चार मुलांसह १८ जण जखमी झाले, असे क्लायमेन्को यांनी सांगितले.खार्किवचे महापौर इहोर तेरेखोव्ह म्हणाले की, रात्रीच्या हल्ल्यात सात अपार्टमेंट इमारतींचे नुकसान झाले, तर दोन इमारतींना थेट धडक बसली. दरम्‍यान, या हल्‍ल्‍याबाबत रशियाने अधिकृत प्रतिकिया दिलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news