Russia drone attack Ukraine | रशियाचा युक्रेनवर तब्बल 728 ड्रोन, 13 क्षेपणास्त्रांद्वारे मोठा हल्ला

Russia drone attack Ukraine | शांततेच्या प्रयत्नांना रशियाचा पुन्हा झटका - झेलेन्स्कींचा आरोप
Russia Ukrain drone war | Putin | Zelenskyy
Russia Ukrain drone war | Putin | Zelenskyyfile Photo
Published on
Updated on

Russia drone attack Ukraine 728 drones and 13 missiles

कीव ः रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. युक्रेनच्या वायुदलानुसार, बुधवारी रात्री रशियाने एकूण 728 ड्रोन व 13 क्षेपणास्त्रांचा मारा केला. युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी यातील 718 ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे.

पश्चिम युक्रेनमधील लुत्स्क शहराचे महापौर इगोर पोलिशचुक यांनी सांगितले की, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ट्रम्प यांच्या घोषणेनंतर हल्ला...

हा हल्ला गेल्या आठवड्यातील रशियाच्या विक्रमी हल्ल्यालाही मागे टाकणारा ठरला आहे. मागील आठवड्यात रशियाने एकूण 550 ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली होती, मात्र यावेळी तो आकडा लक्षणीयरीत्या वाढवण्यात आला.

हा हल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला अधिक शस्त्रास्त्रे पुरविण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच करण्यात आला. ट्रम्प यांनी याआधीच्या धोरणात बदल करत रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर "बकवास" वक्तव्य केल्याचा आरोपही केला आहे.

Russia Ukrain drone war | Putin | Zelenskyy
Monika Kapoor Extradition | भारताला 25 वर्षे गुंगारा देणाऱ्या फरार मोनिका कपूरला अटक; अमेरिकेतून भारतात आणण्यात CBI ला यश

रशियाकडून सातत्त्याने युद्धविरामाला नकार - झेलेन्स्कींचा आरोप

दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की यांनी रशिया सतत शांततेच्या प्रयत्नांना नाकारत असल्याचा पुनरुच्चार केला. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, "हा हल्ला खूप काही सांगून जाणारा आहे – अनेक देशांनी युद्धविराम व शांततेसाठी प्रयत्न केले, परंतु रशिया त्याला सातत्याने नकार देत आहे."

"आमचे आंतरराष्ट्रीय भागीदार जाणून आहेत की रशियावर दबाव टाकण्यासाठी कोणती भूमिका घ्यावी लागेल, ज्यामुळे ते युद्ध थांबवण्याचा विचार करतील, नव्हे तर नवीन हल्ले सुरू ठेवणार नाहीत," असेही झेलेन्स्की म्हणाले.

2022 - युद्धाच्या सुरुवातीचे प्रयत्न

फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर काही आठवड्यांतच तुर्कस्तान (Turkey) आणि बेलारूस (Belarus) यांच्या मध्यस्थीने रशिया व युक्रेन यांच्यात आरंभीक शांतता चर्चा झाली.

काही बैठकांमध्ये युद्धबंदी, नागरी सुरक्षितता, अन्न व इंधन पुरवठा यावर चर्चा झाली होती. मात्र, बुचा नरसंहार (Bucha massacre) उघडकीस आल्यानंतर युक्रेनने चर्चेतून माघार घेतली. या घटनेनंतर रशियावर युद्धगुन्ह्यांचे आरोप झाले.

Russia Ukrain drone war | Putin | Zelenskyy
Armenia parliament brawl | आर्मेनियाच्या संसदेत राडा! एकमेकांच्या अंगावर धावून जात खासदारांची मारहाण; पाहा व्हिडिओ

आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रयत्न

  • संयुक्त राष्ट्र (UN): युएनने मानवी मदत, अन्नधान्य वाहतूक आणि युद्धग्रस्त भागात शांततेचा आग्रह धरला आहे. मात्र, रशिया सुरक्षा परिषदेत (UNSC) स्थायी सदस्य (Veto Power) असल्याने कठोर कारवाई रोखली गेली.

  • चीन, भारत व आफ्रिकन देशांचे प्रस्ताव: चीनने 12 बिंदूंचा शांतता आराखडा सादर केला, ज्यात युद्धविराम, साखळी पुरवठा, अण्वस्त्र वापर निषेध अशा मुद्द्यांचा समावेश होता. भारत सतत दोन्ही देशांशी संवाद ठेवत आहे, आणि युद्धाच्या राजनैतिक मार्गाने समाधानाचे समर्थन करत आहे.

  • स्वित्झर्लंडमध्ये जून 2024 मध्ये शांतता परिषद: युक्रेनच्या समर्थनार्थ 90 पेक्षा अधिक देशांनी स्वित्झर्लंडमध्ये एकत्र येऊन युद्धविराम व शांतता यावर चर्चा केली. रशिया या परिषदेला आमंत्रित नव्हता, त्यामुळे ती एकतर्फी वाटली.

Russia Ukrain drone war | Putin | Zelenskyy
Asim Munir President Pakistan | पाकिस्तानात उलथापालथ? लष्करप्रमुख असीम मुनीर बनणार राष्ट्रपती? पुन्हा लष्करी उठावाची शक्यता...

झेलेन्स्की आणि पुतिन यांची भूमिका

झेलेन्स्की (Zelenskyy):-

युक्रेनचा अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले होते की, रशियाने जर 2014 नंतर कब्जा केलेले सर्व प्रदेश (विशेषतः डोनेत्स्क, लुहान्स्क व क्रिमिया) परत केले, तरच शांतता शक्य आहे. त्यांनी एक शांतता आराखडा सादर केला होता ज्यामध्ये युद्धबंदी, अण्वस्त्र धोका टाळणे, अन्नसुरक्षा, न्यायिक प्रक्रिया आणि रशियाकडून नुकसानभरपाईची मागणी होती.

पुतिन (Putin):-

पुतिन यांना वाटते की युक्रेनने NATO मध्ये सामील होणे हा रशियाच्या सुरक्षेसाठी धोका आहे, म्हणून ते युक्रेनमध्ये रशिया-समर्थक सरकार स्थापन करू इच्छितात. त्यांनी नुकतेच म्हटले की, "युक्रेनने जर क्रिमियावरील हक्क सोडला आणि NATO मध्ये जाणार नाही असे कबूल केले, तर चर्चा होऊ शकते." पण युक्रेन आणि पाश्चिमात्य देश याला पूर्णपणे नाकारतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news