

Vladimir Putin रशियाचे अध्यक्ष व्लादिमार पुतिन नुकतेच 4 - 5 डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येऊन गेले. त्यांची आणि मोदींची भेट, दोन्ही देशातील परराष्ट्र सेवा, व्यापार करार, तेल पुरवठा याबाबत जगाचे लक्ष या भेटी कडे होत. पण यामध्ये भारतीय लोकांना एका गोष्टीचे नवल वाटले ते म्हणजे पुतिन वापरत असलेल्या कारचे. या कारचे नाव आहे Aurus Senat अनेक वैशिष्ट्यांनी भरलेली ही कार पुतिन यांच्यासारखीच रहस्यमय आहे. ही कार प्रथम 2018 मध्ये जगासमोर आणण्यात आली.
काय आहे या कारमध्ये ?
रशियांच्या अध्यक्षांसाठी तयार केलेल्या Aurus Senat या कारला चालता-फिरता किल्ला असेही संबोधले जाते. ही गाडी पूर्णपणे बुलेटप्रूफ आहे, त्याचबरोबर बॉम्बस्फोटाशी सामना करू शकणाऱे कवच (armour) असलेली आहे. यासह जरी अध्यक्षांवर रासायनिक हल्ला झाला तरी त्यांचे संरक्षण करण्याचे क्षमता या कारमध्ये आहे. यामध्ये अतिशय उच्चा दर्जाचे हवेचे फिल्ट्रेशन सिस्टिम आहे, म्हणजे विषारी वायू, धूर किंवा रासायनिक हल्ल्यांपासून प्रवाशांचे संरक्षण होते. फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिसच्या मानकांनुसार ही कार तयार करण्यात आली आहे. याचे
इमर्जंजीच्या वेळी टियर गॅस सोडण्याची क्षमता
या कारला बसवलेले टार्यसही बुलेट फ्रुफ आहेत. यामध्ये इमर्जंन्सीच्या वेळी टियर गॅसही सोडण्याची क्षमता आहे. इंधन टाकी सुद्धा स्फोट-प्रतिरोधक आहे. तसेच याला 4.4 लिटर ट्विन-टर्बो V8 हायब्रिड इंजिन आहे हे सुमारे 598 हॉर्सपॉवर व 880 Nm टॉर्क तयार करते. पाठीमागील बाजूला एक इमर्जन्सी दरवाजाही बसवला आहे. तसेच याचे वजन 7 टन इतके आहे. याच्या काचा 6 सेमी जाडीच्या बुलेटप्रुफ काचा आहेत.
तसेच या कारमध्ये अत्यंत लक्झरिअस इंटिरीअर केले आहे लक्झरी सीट्स, हीटिंग/कूलिंग फंक्शन्स, उच्च दर्जाचे लेदर सिटस् प्रायव्हसी पार्टिशन व अशा सुविधा आहेत. पाठीमागे कोणीही राजकीय नेते बसले तर गुप्त चर्चेसाठी प्रायव्हसी मिळू शकते. राजकीय भेटी, परकीय दौरे, आणि उच्च सुरक्षा आवश्यकता असलेल्या प्रसंगांसाठी ही कार वापरली जाते. एकंदरीत रशियन अध्यक्षांच्या प्रतिष्ठेला साजेशी ही कार बनवण्यात आली आहे.