

pulwama master mind hamza burhan killed: पुलवामा हल्ल्याचा मास्टर माईंड दहशतवादी हमजा बुरहानला पाकिस्तानात एका अज्ञात व्यक्तीने गोळी मारली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात दहशवादी हमजा ठार झाला आहे. दबशतवादी हमजा बुरहानला पाकिस्तानातील मुजफ्फराबादमध्ये गोळी मारण्याती आली. मुज्जफराबाद पाक व्याप्त काश्मीरमध्ये आहे. हमजा बुरगान २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. पाकिस्तानात तो स्वतःला एक शिक्षक म्हणवून घेत होता.
पुलवामा हल्ला हा १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये झाला होता. यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी हमजा बुरहानला अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घातल्या. ही घटना ज्यावेळी हमजा हा पाक व्याप्त काश्मीरमध्ये आपल्या ऑफिसमध्ये बसला होता त्यावेळी घडली.
हमजा हा पुलवामा हल्ल्याचा कट रचण्यात सामील होता. तो पाकिस्तानात स्वतःला शिक्षक म्हणवून घेत होता. त्याचबरोबर २०१९ नंतर झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यात त्याचा समावेश होता. पाक व्याप्त काश्मीरमध्ये तो अनेक संघटनांना ट्रेनिंग देत होता. तसेच सीमा भागातून दहशतवाद्यांना भारताच्या हद्दीत घुसवण्यात देखील मदत करत होता.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन बालाकोट लाँच केलं होतं. यात पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाभूत केले होते.