US 100 foot tsunami threat | अमेरिकेच्या किनाऱ्यावर 100 फूट उंचीच्या त्सुनामीची शक्यता

US 100 foot tsunami threat | कॅसकेडिया सबडक्शन झोनच्या अभ्यासानंतर वैज्ञानिकांचा इशारा, 8 ते 9 रिश्टर स्केलच्या भूकंपाची शक्यता
tsunami wave
tsunami wavePudhari
Published on
Updated on

US 100 foot tsunami threat

पुढारी ऑनलाईन डेस्क ः जग एकीकडे युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या संकटांवर लक्ष केंद्रित करतंय, तेव्हा निसर्गाने मात्र आपली शक्ती पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.

‘Proceedings of the National Academy of Sciences’ या प्रतिष्ठित वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासानुसार, अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर इतिहासातील सर्वात मोठ्या आपत्तींपैकी एक आपत्ती घडू शकते आणि ती "कधीही" होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.

ही आपत्ती म्हणजे 100 फूट उंचीच्या लाटा असलेली त्सुनामी. कॅसकेडिया सबडक्शन झोन या भूकंपप्रवण क्षेत्रातील घडामोडींमुळे आपत्ती ओढवू शकते.

काय आहे हा 'कॅसकेडिया धोका'?

कॅसकेडिया सबडक्शन झोन (Cascadia Subduction Zone) ही उत्तर कॅलिफोर्निया ते कॅनडातील ब्रिटीश कोलंबियापर्यंत पसरलेले भूकंपीय क्षेत्र आहे. गेली 300 वर्षे या भागात मोठी भूकंपक्रिया घडलेली नाही.

परंतु वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, हा झोन जेव्हा तुटेल, तेव्हा ती घटना 8 ते 9 रिश्टर स्केलच्या भूकंपासह 100 फूट उंचीच्या त्सुनामीस कारणीभूत ठरू शकते.

tsunami wave
Bitchat Jack Dorsey | ट्विटरचा सहसंस्थापक जॅक डॉर्सीने आणले नवे मेसेजिंग अ‍ॅप, थेट व्हॉट्सअ‍ॅपशी टक्कर; इंटरनेटशिवाय चालणार...

अभ्यासकांनी व्यक्त केला धोका...

प्रा. टीना ड्यूरा या अभ्यासाच्या मुख्य संशोधक म्हणतात की, "आपण दरवर्षी 3-4 मिमीने वाढणाऱ्या समुद्रपातळीबद्दल चिंता व्यक्त करतो, पण येथे आपण दोन मीटरची वाढ 'काही मिनिटांत' पाहणार आहोत. आपण या विषयावर अधिक गंभीरपणे का बोलत नाही?"

भूस्खलन आणि वाढता जलस्तर

या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, या भूकंपामुळे काही मिनिटांतच जमीन अर्धा ते दोन मीटरपर्यंत खाली जाईल. या झपाट्याने होणाऱ्या भूस्खलनामुळे आणि आधीपासूनच वाढत असलेल्या समुद्राच्या पातळीमुळे, पुराचा धोका अनेक पटीने वाढेल.

कोणते भाग आहेत धोक्यात?

अमेरिकेतील वॉशिंग्टन, ओरेगन आणि उत्तरेकडील कॅलिफोर्नियामधील अनेक किनारी शहरांवर या आपत्तीचा थेट परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ:

हम्बोल्ट बे (Humboldt Bay) – येथे जमीन झपाट्याने खाली जात आहे आणि 2030 पर्यंत समुद्राची पातळी जमिनीपेक्षा अधिक वेगाने वाढेल.

कोस बे (Coos Bay) आणि याक्विना बे (Yaquina Bay) – येथे पाण्याची पातळी वाढताना दिसून येत आहे.

अस्टोरिया (Astoria), पोर्ट ऑरफर्ड (Port Orford) – या ठिकाणी जमीन अजूनही वर जात आहे, त्यामुळे या भागांमध्ये तात्पुरता दिलासा असला, तरी धोका कायम आहे.

tsunami wave
Shubhanshu Shukla return | अंतराळ स्थानकातून 'या' दिवशी पृथ्वीच्या दिशेने येणार शुभांशु शुक्ला; अटलांटिक महासागरात उतरणार यान

2050 आणि 2100 पर्यंत काय बदल घडू शकतात?

  • 2050- समुद्रपातळी 10 ते 30 सेंमी पर्यंत वाढण्याची शक्यता

  • 2100- उच्च कार्बन उत्सर्जन सुरूच राहिल्यास, ही वाढ 40 ते 90 सेंमी होऊ शकते

दरम्यान, भूकंप झाल्यास जमिन धसण्याच्या प्रकरांत भर पडेल

सावधगिरी आणि तयारीची गरज

शास्त्रज्ञांच्या मते, या भागासाठी आता केवळ हवामान बदलावर लक्ष केंद्रित न करता, भूकंप आणि त्सुनामीसारख्या आपत्तींवरही अधिक जागरूकता, नियोजन आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news