Bitchat Jack Dorsey | ट्विटरचा सहसंस्थापक जॅक डॉर्सीने आणले नवे मेसेजिंग अ‍ॅप, थेट व्हॉट्सअ‍ॅपशी टक्कर; इंटरनेटशिवाय चालणार...

Bitchat Jack Dorsey | जाणून घ्या बिटचॅटची वैशिष्ट्ये आणि कार्यपद्धती
Bitchat Jack Dorsey
Jack Dorsey | BitchatPudhari
Published on
Updated on

Bitchat new messeaging app by Jack Dorsey it will work without internet

पुढारी ऑनलाईन डेस्क ः जगभरात सोशल मीडिया आणि मेसेजिंग अ‍ॅप्सचा वापर वाढत असतानाच ट्विटरचे सह-संस्थापक आणि Block या कंपनीचे CEO जॅक डोर्सी यांनी एक नवीन क्रांतिकारी मेसेजिंग अ‍ॅप आणले आहे. Bitchat असे या अॅपचे नाव आहे. विशेष म्हणजे, हे अ‍ॅप इंटरनेटशिवाय देखील काम करते.

काय आहे Bitchat?

Bitchat हा एक decentralized (विकेंद्रीत) मेसेजिंग अ‍ॅप आहे जे Wi-Fi किंवा मोबाईल नेटवर्कशिवाय चालते. हे अ‍ॅप Bluetooth mesh networking तंत्रज्ञानाचा वापर करते. ज्यामुळे जवळपास असलेले मोबाईल डिव्हाईस एकमेकांशी थेट कनेक्ट होऊ शकतात.

हे अ‍ॅप विशेषतः अशा परिस्थितीत उपयुक्त आहे जिथे इंटरनेट सेवा उपलब्ध नसते – जसे की: दुर्गम भाग, आपत्कालीन परिस्थिती, मोठ्या सभा, फेस्टिव्हल्स, इंटरनेट बंदी असलेले भाग अशा ठिकाणी ते उपयुक्त ठरू शकते.

Bitchat Jack Dorsey
OpenAI web browser | ओपन एआय लवकरच आणणार नवा स्मार्ट वेब ब्राऊजर; Google क्रोमला थेट आव्हान

Bitchat कसे काम करते?

Bluetooth Mesh Networking: डिव्हाईसेस Bluetooth द्वारे एकमेकांशी जोडली जातात. जर संदेशाचा प्राप्तकर्ता जवळ नसेल, तर तो संदेश इतर डिव्हाइसमार्फत "हॉप करत" पुढे पोहोचतो. याला mesh routing म्हणतात.

सिक्युरिटी : सर्व संदेश end-to-end encryption ने सुरक्षित केले जातात. म्हणजेच संदेश फक्त पाठवणारा आणि प्राप्तकर्ता यांनाच वाचता येतो.

प्रायव्हसी: कोणताही फोन नंबर, ईमेल किंवा खाते तयार करण्याची गरज नाही

कोणतीही जाहिरात किंवा डेटा संकलन नाही

वापरकर्त्याचे स्थान किंवा ओळख ट्रॅक केली जात नाही

Bitchat ची वैशिष्ट्ये (Features)

  • Decentralized नेटवर्क - कोणत्याही सेंट्रल सर्व्हरशिवाय थेट पीअर-टू-पीअर मेसेजिंग

  • End to end Encryption- X25519 + AES 256 GCM वापरून सुरक्षित संदेशवहन

  • ग्रुप चॅटसाठी चॅनेल्स- पासवर्ड प्रोटेक्शनसह टॉपिकनुसार ग्रुप्स तयार करता येतात

  • Store & Forward- ऑफलाइन वापरकर्ते परत कनेक्ट झाल्यावर त्यांना संदेश मिळतो

  • Cover Traffic- नकली मेसेज आणि random delays वापरून ट्रॅफिक मॉनिटरिंगपासून संरक्षण

  • Emergency Wipe- अ‍ॅपचे लोगो तिप्पट टॅप केल्यास सर्व स्थानिक डेटा त्वरित नष्ट होतो

  • Adaptive Power Modes- बॅटरीची बचत करणारे स्मार्ट स्कॅनिंग इंटरव्हल्स

  • IRC स्टाईल इंटरफेस- /j #channel, /m @name यांसारख्या ओळखीच्या कमांड्ससह

  • Platform Support- सध्या iOS आणि macOS साठी उपलब्ध, Android वर लवकरच येणार

Bitchat Jack Dorsey
Gautam Adani healthcare: अदानींची वैद्यकीय क्षेत्रात एंट्री; 60,000 कोटींची गुंतवणूक, मुंबई-अहमदाबादेत 'हेल्थकेअर टेम्पल्स'

iOS Beta चाचणीत Bitchat ला प्रचंड प्रतिसाद

सध्या जॅक डॉर्सीचे हे Bitchat अ‍ॅप iOS साठी Apple च्या TestFlight प्लॅटफॉर्मवर बीटा टप्प्यात आहे आणि 10,000 युजर्सची लिमिट पूर्ण झाली आहे. यावरून युजर्सचा प्रचंड उत्साह दिसून येतो. अँड्रॉइड व्हर्जन लवकरच सादर होण्याची शक्यता आहे.

कोणासाठी उपयुक्त?

  • इंटरनेट शिवाय संवाद साधू इच्छिणारे युजर्स

  • गोपनीयतेला प्राधान्य देणारे कार्यकर्ते, पत्रकार

  • नैसर्गिक आपत्ती, आंदोलन किंवा नेटवर्क नसलेल्या परिस्थितीत असलेले नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news