व्हॅटिकन सिटीत लिफ्टमध्ये अडकले पोप

Published on
Updated on

व्हॅटिकन सिटी : पुढारी ऑनलाईन 

व्हॅटिकन सिटी येथे रविवारी वीज गेल्याने पोप फ्रान्सिस हे लिफ्टमध्ये अडकले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नानंतर त्यांना २५ मिनिटांनी सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. 

रविवारी सेंट पीटर्स स्क्वेयर येथे साप्ताहिक भाषणासाठी आलेल्या पोप फ्रान्सिस यांनी लोकांसमोर स्वतःचा अनुभव शेअर केला आणि सुरक्षितरीत्या बाहेर काढल्यामुळे अग्निशमन दलाचे आभारही मानले. या कार्यक्रमात पोप १० मिनिटे उशिरा पोहोचले होते. 

लोकांना संबोधित करताना ते म्हणाले की, उशीर झाल्याबद्दल मी तुमची माफी मागतो. व्हॅटिकनमध्ये वीज समस्या सुरू आहे आणि मला २५ मिनिटे लिफ्टमध्ये अडकावे लागले. व्हेटिकनच्या अग्निशमन दलाने मला बाहेर काढले. या विभागाची स्तुती केली पाहिजे. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news