पाकिस्तानमधील अनेक शहरांत सक्तीचे 'लॉकडाऊन', जाणून घ्या कारण काय?

Pakistan Air Pollution | अनेक शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) २ हजारांहून अधिक
Pakistan Air Pollution
पाकिस्तानमधील अनेक शहरांमध्ये सक्तीचे 'लॉकडाऊन', जाणून घ्या काय आहे कारण? File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमध्ये प्रदूषणामुळे परिस्थिती अधिक बिघडली आहे. अनेक शहरातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. भारताच्या तुलनेत तेथे ४ ते ५ पट अधिक प्रदूषण वाढले आहे. पाकिस्तानातील अनेक महत्त्वाच्या शहरात हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) हा २ हजारांहून अधिक नोंदवला गेल्याने हाहाकार उडाला आहे.

पाकिस्तानातील शहरात AQI 2 हजारांवर

वाढत्या प्रदूषण समस्येमुळे भारतातील अनेक शहरांची स्थिती चिंताजनक आहे. भारतात हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI-Air Quality Index) 400 वर पोहोचला तर हवामान प्रदूषणाबाबत गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागतात. पण आपल्या शेजारील देश पाकिस्तानची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, घराबाहेर पडणे देखील कठीण झाले आहे. दरम्यान शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील अनेक शहरांचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) हा भारताच्या तुलनेत ४ ते ५ पट जास्त वाढला आहे.

'ही' ठिकाणे १७ नोव्हेंबरपर्यंत राहणार बंद

वृत्तानुसार, पाकिस्तान सरकारने धोकादायक धुके आणि प्रदूषण पातळी वाढल्यामुळे 8 ते 17 नोव्हेंबरपर्यंत अनेक जिल्ह्यांतील मनोरंजन पार्क, संग्रहालये आणि शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश लाहोर, ननकाना साहिब, गुजरात, हाफिजाबाद, मंडी बहाउद्दीन, सियालकोट, नारोवाल, चिनियोट, गुजरांवाला, फैसलाबाद, मुलतान, शेखूपुरा, कसुर, झांग, टोबा टेक सिंग आणि शेखूपुरा तसेच लोधरणसह अनेक शहरांमध्ये लागू करण्यात आला आहे.

हवेतील PM 2.5 कणांची वाढ, प्रदूषण-आजाराला निमंत्रण

आईक्यूएयर (IQAir) कंपनीनुसार, पाकिस्तानमधील हवेत PM 2.5 कणांचे प्रमाण (हवेत असलेले कण जे आरोग्याला सर्वाधिक हानी पोहोचवतात) 947 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरवर पोहोचले, जे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा 189.4 पट जास्त आहे. पाकिस्तानातील मुलतानमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 2 हजारांहून अधिक नोंदवले गेले. माहितीनुसार, मुल्तान, शम्साबाद कॉलनी आणि मुलतान कॅन्टोन्मेंट परिसरातील WWF-पाकिस्तान कार्यालयात AQI रीडिंग अनुक्रमे 2,316, 1,635 आणि 1,527 नोंदवले गेले. एवढी प्रदूषित हवा निरोगी माणसाला आजारी पडण्यासाठी पुरेशी आहे, असेही वृत्तात म्हटले आहे.

'या' शहरांचा जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये समावेश

शुक्रवारी (दि.८) पाकिस्तानातील सात शहरांचा जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये समावेश करण्यात आला आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) मुलतानमध्ये 2,135 आणि लाहोरमध्ये 676 नोंदवला गेला. पेशावर, इस्लामाबाद, हरिपूर, रावळपिंडी आणि कराची यांसारख्या शहरांतील हवेचेही वर्णन 'धोकादायक हवेची गुणवत्ता' आहे. बुधवार ६ नोव्हेंबर रोजी लाहोरला जगातील सर्वात प्रदूषित शहर घोषित करण्यात आले होते, जेथे AQI 1,165 होता. जो जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शिफारस केलेल्या पातळीपेक्षा 120 पट जास्त आहे. धोकादायक धुके आणि प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असून, रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news