London plane crash | लंडनच्या एअरपोर्टवर लँडिंगवेळी विमान कोसळले; प्रचंड स्फोट अन् धुराचे लोट, पाहा व्हिडिओ

London plane crash | झूश एव्हिएशनचं विमानाचा साउथएन्ड विमानतळावर भीषण अपघात; विमानतळ बंद, आपत्कालीन सेवा तैनात
London plane crash | लंडनच्या एअरपोर्टवर लँडिंगवेळी विमान कोसळले; प्रचंड स्फोट अन् धुराचे लोट, पाहा व्हिडिओ
Published on
Updated on

London plane crash southend airport

एसेक्स (ब्रिटन) : लंडन साउथएन्ड विमानतळावर रविवारी एका लहान प्रवासी विमानाचा अपघात झाला असून या अपघातात मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेमुळे विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्काळ स्थगित करण्यात आली असून परिसरात मोठ्या प्रमाणावर आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान हे Beechcraft B200 Super King Air प्रकाराचे होते.

हे विमान झूश एव्हिएशन (Zeusch Aviation) या नेदरलँड्समधील खासगी विमानसेवा कंपनीद्वारे चालवले जात होते. हे वैद्यकीय प्रणालींनी सुसज्ज असलेले विशेष विमान होते, जे रुग्णांच्या वाहतुकीसाठी वापरले जात होते.

प्रचंड स्फोट आणि धुराचे लोट

अपघातानंतर लगेचच सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यामध्ये मोठ्या स्फोटासारखा आवाज होऊन आकाशात धुराचे प्रचंड लोट उठले. या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

अपघातावेळी विमानात किती लोक होते याबाबत स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे की नाही, याचीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी Rochford Hundred Golf Club आणि Westcliff Rugby Club या परिसरातील दोन ठिकाणांचे सावधतेसाठी स्थलांतर केले आहे, कारण ही ठिकाणे अपघाताच्या घटनास्थळाच्या अगदी जवळ आहेत.

London plane crash | लंडनच्या एअरपोर्टवर लँडिंगवेळी विमान कोसळले; प्रचंड स्फोट अन् धुराचे लोट, पाहा व्हिडिओ
Ramayana in Pakistan | पाकिस्तानात रामायणाचे भव्य सादरीकरण; सर्व कलाकार मुस्लीम, AI मुळे महाकाव्याला आधुनिक झलक

अपघाताची माहिती आणि आपत्कालीन सेवा

एसेक्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अपघाताची माहिती मिळाली. अपघातग्रस्त विमानाची लांबी सुमारे 112 मीटर (39 फूट) असून ते साउथएन्ड विमानतळावर लँडिंग वेळी कोसळल्याची शक्यता आहे.

पूर्व इंग्लंड अॅम्ब्युलन्स सेवेने (East of England Ambulance Service) तात्काळ चार अॅम्ब्युलन्स, एक रॅपिड रिस्पॉन्स वाहन, चार हॅझार्डस एरिया रिस्पॉन्स युनिट्स, तीन वरिष्ठ पॅरामेडिक गाड्या आणि एअर अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पाठविल्या.

कित्येक उड्डाणे रद्द, विमानतळ बंद

या अपघातानंतर लंडन साउथएन्ड विमानतळावरून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली असून पुढील सूचना मिळेपर्यंत विमानतळ पूर्णपणे बंद राहणार आहे. विमानतळ प्रशासनाने आणि एअर अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन टीमने तपास सुरु केला आहे.

London plane crash | लंडनच्या एअरपोर्टवर लँडिंगवेळी विमान कोसळले; प्रचंड स्फोट अन् धुराचे लोट, पाहा व्हिडिओ
Balochistan leader on Operation Baam| बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये कदापि समाविष्ट होणार नाही; ‘ऑपरेशन बाम’ ही तर केवळ सुरवात...

विमानाची माहिती आणि उड्डाणाचा मार्ग

विमानाने रविवारी अ‍ॅथन्स (ग्रीस) येथून उड्डाण घेतले होते, त्यानंतर पुला (क्रोएशिया) येथे गेले होते. नंतर ते साउथएन्ड येथे पोहोचले आणि तिथून नेदरलँड्सच्या लेलिस्टाड येथे परत जाण्याच्या तयारीत होते.

झूश एव्हिएशनने या अपघाताची पुष्टी करताना सांगितले की, “आमचे सर्व सहकार्य तपास यंत्रणांना आहे. या दुर्घटनेत प्रभावित झालेल्यांबद्दल आम्ही अत्यंत दुःखी आहोत.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news