

Pets As Wedding Witnesses: लग्नावेळेच्या परंपरा आणि प्रथा आता बदलत आहेत. आता माणसांसोबतच पाळीव प्राणी देखील लग्नाचे साक्षीदार होत आहेत. इक्वाडोरमध्ये असेच एक प्रकरण समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका नवविवाहित जोडप्याने आपल्या पाळीव श्वान लूना ला लग्नाचा साक्षीदार बनवलं. त्यांनी आपल्या लग्नाच्या प्रमाणपत्रावर लुनाचा पंजा उमटवला.
३८ वर्षाच्या डायना टुपिजा आणि ३१ वर्षाच्या एड्रेस अल्किंगा यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नात लूना हा त्यांचा पाळीव श्वान फक्त उपस्थित नव्हता तर तो साक्षीदार देखील होता. त्याने कागदपत्रावर आपली मोहर उमटवली.
लग्न सोहळ्यानंतर डायना टुपिजा यांनी न्यूज एजन्सी एएफपीशी बोलताना सांगितलं की, लूना इथं उपस्थित होती. हा खूप चांगला अनुभव होता. तिचा पती अँड्रेस अल्किंगा यांनी सांगितलं की लूनाला गुलाबी ड्युल गाऊन घालण्यात आला होता. प्राणी आपल्याशी बोलू शकत नाहीत किंवा आपल्याला सल्ला देऊ शकत नाहीत. मात्र ते आपल्याला सर्व प्रेम देतात.
वधूची आई लूज लीमा यांना सुरूवातीला ही कल्पना आवडली नव्हती. मात्र नंतर त्यांनी स्वतः लूनासाठी ड्रेस तयार केला. लीमा यांनी हा मॉडर्न जमाना आहे. टुपिजा यांनी सांगितलं की त्यांच्याजवळ तीन श्वान आणि एक मांजर आहे. ते सर्व इथं असते तर खूप चांगलं झालं असतं. मात्र त्यांच्या वतीनं लूना आज उपस्थित होती.
अक्वाडोअर सिविल रजिस्ट्रीचे संचालक ओटन रिवाडेनेरा यांनी याचे समर्थन करताना सांगितलं की आता आपल्याला वर्तमान आणि भविष्यातील कौटुंबीक रचनेनुसार जुळवून घ्यावं लागेल. लग्नाच्या कागदपत्राला सिंम्बॉलिक मॅरेज सर्टिफिकेट संबोधलं गेलं आहे. ज्याच्यावर पाळीव प्राण्याच्या पंज्याचे निशाण आहे. त्यासाठी खास जागा ठेवण्यात आली आहे. कायद्याने प्राण्याच्या पंजाचे निशाण बंधनकारक नाहीये. मात्र याला भावनिक महत्व आहे.
देशातील सध्याच्या जनगणनेनुसार इक्वाडोरमध्ये १.९ कोटी लोकं असून जवळपास ७६ लाख पाळीव श्वान आणि मांजरे आहेत. ही संध्या १२ वर्षाखालील मुलांपेक्षा जवळपास दुप्पट आहे. त्यामुळं इक्वाडोरने नुकतेच पेट फ्रेंडली लग्नांना परवानगी दिली होती. त्यानंतर लग्नात पाळीव प्राण्यांची उपस्थिती लक्षणीयरित्या वाढली. मे महिन्यापासून आतापर्यंत जवळपास ५० पेक्षा जास्त जोडप्यांनी आपल्या पाळीव प्राण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली आहे.