Marriage Issue: ६० लाख रूपये कमवणाऱ्या महिलेला मिळेना नवरदेव... लग्नाच्या बाजारात रडूच कोसळलं

Marriage Issue
Marriage Issuepudhari
Published on
Updated on

Marriage Issue: आजच्या जगात लग्नाचे निकष पूर्णपणे बदलले असून आता चांगले शिक्षण, चांगले करिअर आणि चांगला पैसा हेच फॅक्टर निर्णायक ठरत आहेत. त्यामुळे लग्नाच्या बाजारात ज्याचं शिक्षण अन् आर्थिक पॅकेज तगडं त्याच्यासाठी चांगली स्थळे हातात हार घेऊन तयार असं चित्र आहे.

मात्र चीनमध्ये वेगळाच ट्रेंड सुरू आहे असं दिसतं. चीनच्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात महिला वर्षाला ५ लाख युआन अर्थात भारतीय रुपयात तब्बल ६० लाख रूपये कमवेत. तिच्याजवळ चांगली नोकरी, उत्तम शिक्षण आणि आर्थिक स्थैर्य आहे. मात्र असं असून देखील तिचं लग्न ठरत नाहीये. तिला सतत नकार ऐकावे लागत आहेत.

Marriage Issue
Marriage Challenges: ‘लग्न करायचंय, पण मुलगी मिळत नाही!’ : समाजासमोरील नवा प्रश्न

मिळालेल्या माहितीनुसार ही महिला आठवड्याच्या वधू बाजारात म्हणजेच लग्नाच्या बाजारात पोहचली होती. तिथं लोकं आपल्या मुला मुलींसाठी जोडीदार शोधत असतात. मात्र इथं उपस्थित असलेल्या कुटुंबांनी या मिहिलेला पसंत केलं नाही. कारण त्या महिलेचे वय हे ३० वर्षापेक्षा जास्त होतं. सतत नकार ऐकून वैतागलेला हा महिला बाहेर येऊन रडू लागली. हा सीन पाहून तिथं उपस्थित असलेले लोक हैरान झाले.

चीनच्या लग्नाच्या बाजारात मुला मुलींचे अनेक फॅक्टर पाहिले जातात. या महिलेचे प्रकरण खूप रंजक आहे. तिची सॅलरी चांगली होती शिक्षण चांगलं होतं. असं मानलं जातं की ज्या व्यक्तींची आर्थिक बाजू भक्कम असते त्यांना जोडीदार मिळवण्यात फारसे कष्ट करावे लागत नाहीत.

Marriage Issue
Supreme Court on dowry death | मुले लग्नानंतर पत्नी, तिच्या कुटुंबाचा छळ का करतात? हुंडाबळी प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा सवाल

मात्र या महिलेबाबत उलटाच प्रकार झाला. त्या महिलेच्या अर्थिक आणि शैक्षणिक बाजूकडे लक्ष न देता तिच्या वयाकडे जास्त फोकस करण्यात आला. अनेक कुटुंबियांच्या मते तिने तिशी पार केली असून हे वय लग्नासाठी आदर्श मानलं जात नाही.

या घटनेनंतर सोशल मीडियावर चर्चेला तोंड फुटलं आहे. अनेक लोकांनी या महिलेच्या समर्थनात आपली मते नोंदवली असून त्यांच्या मते एखाद्या व्यक्तीचे मुल्य हे तिच्या वयावर नाही तर त्याच्या व्यक्तिमत्वावर, विचारांवर आणि जीवनात काय यश संपादन केलं आहे त्यावर ठरलं पाहिजे.

Marriage Issue
Bride missing case: लग्नाचा हॉल बुक...हळदीची तयारी फुल्ल; पण नवरीच कुटुंबीयांसह ‘मिसिंग‌’!

अनेक युजर्सनी मॉडर्न महिलांना लग्नासाठी फक्त वयाच्या आधारावर जज करणं योग्य नाही. काही लोकांनी लग्न हा पारंपरिक विचारावर आधारित आहे. हीच पारंपरिकता अनेक कुटुंबांमध्ये खोलवर रूजलेली आहे. त्यामुळं अनेकजण वयाला जास्त प्राधान्य देत आहेत. नवीन पिढीतील हा विचार बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news