

Pakistan Peace Rally Bomb Blast: पाकिस्तानमधील खैबर पख्तुनवा भागात आज शांतता यात्रेवेळी बॉम्ब स्फोट झाला असून त्यात १३ लोकांचा मृत्यू झाला तर २२ लोक जखमी झाले आहे. हा बॉम्ब स्फोट पाकिस्तानी पोलिसांना टार्गेट करण्यासाठी करण्यात आला होता. याबाबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्वात जिल्ह्यात ज्यावेळी शांतता यात्रा सुरू होती त्याचवेळी हा हल्ला झाला आहे.
हा बॉम्ब स्फोट एक आत्मघातकी हल्ला होता. याबाबतची अधिकृत पुष्टी अजून झालेली नाही. ही रॅली स्थानिक ट्रायबल काऊन्सील अमन जिरगा यांनी आयोजित केले होते. ते शांततेत घोषणाबाजू करत रॅली काढत होते. त्यांच्या हातात त्यांच्या मागण्यांबाबतचे फलक होते. त्यावर त्यांच्या भागातील गेल्या काही महिन्यात घसरलेल्या सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
बॉम्ब स्फोटानंतर बचाव पथकाने जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल केलं. त्यानंतर पोलिसांनी या भागात नाकाबंदी केली आहे.