

Delhi Blast Pakistan Army Involvement:
पाकिस्तानी पत्रकार ताहा सिद्दकी यांनी नुकतेच सोशल मीडियावर एक मोठं वक्तव्य केलं होतं. त्यांनी पाकिस्तान आणि भारत - पाकिस्तान सीमेवर झालेल्या बॉम्बस्फोटात पाकिस्तानी लष्कराचा हात आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ता ताहा सिद्दकी यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी नुकतेच इस्लामाबाद आणि दिल्लीत झालेल्या बॉम्ब स्फोटामागं पाकिस्तानी लष्कराची मोठी भूमिका असल्याचं वक्तव्य केलं. हे वक्तव्य त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलं आहे. त्यात त्यांनी पाकिस्तानी लष्करावर आपल्या परराष्ट्र धोरणासाठी दहशतवाद हा एक हत्यार म्हणून वापर करत असल्याचा आरोप केला.
ताहा सिद्दरी आपल्या पोस्टमध्ये लिहितात, 'पाकिस्तानी लष्कर हे भारत आणि इतर देशात दहशतवाद निर्यात करते. त्यांची ही जुनी पद्धत आहे. त्याद्वारे जे आपली रणनैतिक हीत साधण्याचा प्रयत्न करतात. पाकिस्तानात अस्तित्वात असलेलं लष्करी शासन दहशतवादाला खतपाणी घालून फक्त क्षेत्रीय शांती धोक्यात आणत नाही तर देशाच्या लोकशाही संस्थांना देखील खिळखिळी करत आहे.
सिद्दकी यांच्या या वक्तव्यानंतर फक्त पाकिस्तानाताच नाही तर आंततराष्ट्रीय स्तरावाल खळबळ उडाली आहे. दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील स्फोटानं संपूर्ण देश हादरला असताना पाकिस्तानी पत्रकारांनी हा दावा केला आहे. दिल्ली स्फोटाशी पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनाचं कनेक्शन समोर येत आहे.
दिल्लीप्रमाणेच पाकिस्तानातील इस्लामाबाद मध्ये देखील अशाच प्रकारचा बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटाचा तपास अजून सुरू आहे.
ताहा सिद्दकी यांनी पाकिस्तानी लष्करावर यापूर्वी देखील काही गंभीर आरोप केले आहेत. ते अनेक दिवसांपासून पाकिस्तानी लष्कराच्या धोरण आणि प्रेस फ्रिडमवर प्रभाव टाकण्यावरून टीका करत आले आहेत. त्यांनी पाकिस्तानी लष्कर माध्यमांवर फक्त नियंत्रण ठेवत नाही तर ते जे पत्रकार त्यांच्याविरूद्ध बोलतील त्या पत्रकारांना देखील टार्गेट करत आहे. २०१८ मध्ये सिद्दकी यांचा कराची एअरपोर्टवरून अज्ञात हल्लेखोरांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांनी फ्रान्समध्ये निर्वासित म्हणून राहणे पसंत केले.
सिद्दकी यांच्या या खळबळजनक दाव्यामुळं पाकिस्तानी पत्रकार समुहात देखील एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. काही पत्रकारांनी सिद्दकी यांचं समर्थन केलं आहे. त्यांच्या आरोपांना गांभिर्यानं घेतलं पाहिजे असं काहीजण म्हणत आहेत तर काहीजण याला राजकीय वक्तव्य म्हणत आहेत. पाकिस्तानी सरकारकडून अजून याबाबत अधिकृत वक्तव्य आलेलं नाही.