Pahalgam Terror Attack | पहलगाममधील दहशतवादी हल्ला पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनीच घडवून आणला!

अमेरिकन वृत्तपत्राचा दावा
Pakistan Army Chief Asim Munir, Pahalgam terror attack
Pahalgam Terror Attack | पहलगाममधील दहशतवादी हल्ला पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनीच घडवून आणला! file photo
Published on
Updated on

Pahalgam Terror Attack |

दिल्ली : पाकिस्तानमधील सत्तेवर नियंत्रण मिळवण्याच्या उद्देशाने पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या आदेशावरून दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला, असा दावा अमेरिकन वृत्तपत्र 'न्यू यॉर्क टाईम्स'ने तज्ञ आणि राजनयिकांच्या हवाल्याने केला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत लवकरच पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. भारत हल्ल्यासाठी तयारी करत आहे, असा दावा देखील 'न्यू यॉर्क टाईम्स'ने केला आहे.

मुनीर यांच्या आदेशावरून हल्ला

दहशतवाद्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या आदेशावरून हल्ला केला. त्यांना पाकिस्तानच्या सत्तेवर नियंत्रण मिळवायचे आहे, म्हणून त्यांनी हा हल्ला घडवून आणला. दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याबद्दल भारताने विविध राजनैतिक अधिकाऱ्यांना काही गुप्तचर माहिती दिली आहे, असा दावा अमेरिकन वृत्तपत्रात केला आहे.

Pakistan Army Chief Asim Munir, Pahalgam terror attack
Pahalgam Attack: पाकिस्तानवर कारवाईचा प्लॅन तयार; पंतप्रधान मोदींचा जागतिक नेत्यांना फोन

पंतप्रधान मोदींनी अनेक जागतिक नेत्यांशी साधला संवाद

न्यू यॉर्क टाईम्सनुसार, पहलगाम हल्ल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक जागतिक नेत्यांशी बोलून त्यांना हल्ल्याची माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात १०० हून अधिक मिशनच्या राजनयिकांनाही माहिती दिली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे भारताने स्पष्टपणे म्हटले आहे.

मुनीर राजीनामा द्या : पाक सैन्य अधिकाऱ्यांचे पत्र

आमचा देश, आमची प्रतिष्ठा आपल्यामुळे लयाला गेली आहे. तुम्ही सगळ्याची माती केली आहे. तुमची वेळ आता संपली आहे. लवकरात लवकर राजीनामा द्या. अन्यथा आम्हाला तो हिसकावून घ्यावा लागेल. मग त्यासाठी आम्हाला जबरदस्ती करावी लागली तरी चालेल, असे मुनीर यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात पाकिस्तानी सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या पत्रात त्यांनी मुनीर यांच्या भ्रष्टाचाराची ब्ल्यू प्रिंटही जाहीर केली आहे.

लष्करप्रमुख मुनीर पाकिस्तानातच..!

जनरल परवेझ मुशर्रफ यांच्याप्रमाणे मुनीर यांनाही लवकरच पाकिस्तानातून परागंदा होण्याची वेळ येऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर दोन दिवसांपासून मुनीर यांनी पाकिस्तान सोडल्याच्या चर्चा होत्या. या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी एक्सवर पोस्ट करून पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत हँडलवरून मुनीर हे अद्यापही पाकमध्येच आहेत, हे दाखवावे लागले. सगळे ठीक आहे, असे म्हणत यासोबत पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख मुनीर यांचे छायाचित्र पोस्ट करण्यात आले आहे.

दहशतवादी हल्ल्यानंतर न्यू यॉर्क टाईम्सवर झाली होती टीका

यापूर्वी, न्यू यॉर्क टाईम्स पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आणखी एका वृत्तामुळे चर्चेत होते. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या एका बातमीमध्ये या क्रूर दहशतवादी घटनेचे वर्णन 'अतिरेकी' हल्ला म्हणून केले होते. अमेरिकन काँग्रेसच्या परराष्ट्र व्यवहार समितीनेही न्यू यॉर्क टाईम्सच्या या भूमिकेबद्दल त्यांना फटकारले होते. न्यू यॉर्क टाईम्सने आपल्या अहवालात हल्लेखोरांना अतिरेकी म्हणून संबोधले होते. अमेरिकन संसदीय समितीने हा शब्द पूर्णपणे चुकीचा असल्याचे सांगत पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचे म्हटले होते.

Pakistan Army Chief Asim Munir, Pahalgam terror attack
Pahalgam Terror Attack | कुठल्याही कारवाईसाठी भारतीय सैन्य सर्वतोपरी सज्ज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news