थायलंडच्या पंतप्रधानपदी पेटोंगटार्न शिनावात्रा यांची निवड

Thailand Prime Minister | पंतप्रधान श्रेथा थाविसिन बडतर्फ
Paetongtarn Shinawatra Thailand's next Prime Minister
थायलंडच्या संसदेने पेटोंगटार्न शिनावात्रा यांची पंतप्रधान म्हणून निवड केली आहे.ANI Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : थायलंडचे पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा यांना न्यायालयाच्या आदेशाने हटवले आहे. त्यानंतर थायलंडच्या संसदेने त्यांच्या कन्या पेटोंगटार्न शिनावात्रा यांची आज (दि. १६) सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. ३७ वर्षीय शिनावात्रा यांना दोन तृतीयांश म्हणजे ३१९ मते मिळाली. तिची मावशी यिंगलक शिनावात्रा यांच्यानंतर पंतप्रधानपद भूषवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत.

पंतप्रधान श्रेथा थाविसिन बडतर्फ

घटनेचे उल्लंघन केल्याप्रकरणी थायलंडच्या न्यायालयाने (Thai court) पंतप्रधान श्रेथा थाविसिन (Thailand Prime Minister Srettha Thavisin) यांना पदावरुन बडतर्फ केले आहे. कधीका‍ळी तुरुंगवास भोगलेल्या एका माजी वकिलाची मंत्रिमंडळात नियुक्ती केल्याबद्दल थायलंडच्या न्यायालयाने थेट पंतप्रधानांवर पदावरून बडतर्फ केले आहे. श्रेथा यांचे वर्तन घटनेचे उल्लंघन करणारे असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे.

पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांच्यावर नैतिकतेचे उल्लंघन केल्याचा ठपका

तुरुंगवास भोगलेल्या एकाची मंत्रीपदी नियुक्ती करून राजकीय उलथापालथ घडवून आणणे. तसेच सत्ताधारी युतीमध्ये बदल घडवून आणून नैतिकतेचे उल्लंघन केल्याचा ठपका न्यायालयाने पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांच्यावर ठेवला आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळख असलेले श्रेथा हे याच न्यायालयाच्या निर्णयानंतर पदावरुन हटवण्यात आलेले १६ वर्षातील चौथे थायलंडचे पंतप्रधान आहेत. ते त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांना बडतर्फ करण्याच्या बाजूने न्यायालयाने ५-४ असा निकाल दिला आहे.

थायलंडमध्ये राजकीय अस्थिरता

श्रेथा यांना एका वर्षाहून कमी कालावधीतच पदावरुन हटवण्यात आल्याने आता नवीन पंतप्रधान निवडण्यासाठी संसदेची बैठक बोलवावी लागणार आहे. थायलंडमध्ये दोन दशके सत्तापालट आणि न्यायालयाच्या निर्णयांमुळे अनेक सरकारे आणि राजकीय पक्षांना धक्के बसले आहेत. यामुळे येथे राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.

Paetongtarn Shinawatra Thailand's next Prime Minister
Thailand | थायलंडचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन पदावरुन बडतर्फ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news