US-Israel Iran War | युद्धामुळे 20 लाखांहून अधिक लोक झाले इराणमध्ये बेरोजगार

आर्थिक संकट गडद; पायाभूत सुविधा, उद्योगांवर परिणाम
US-Israel-Iran War |
US-Israel Iran War | युद्धामुळे 20 लाखांहून अधिक लोक झाले इराणमध्ये बेरोजगार
Published on
Updated on

तेहरान; वृत्तसंस्था : इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असून 20 लाखांहून अधिक लोक बेरोजगार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इराणी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधीच आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि इंटरनेट बंदीमुळे अडचणीत असलेल्या अर्थव्यवस्थेवर या युद्धाचा गंभीर परिणाम झाला आहे.

Summary
  • तेल, गॅस आणि औद्योगिक क्षेत्रांना मोठा फटका

  • इंटरनेट बंदीमुळे डिजिटल अर्थव्यवस्था ठप्प

  • 50 टक्के कामगार संख्या बेरोजगारीच्या धोक्यात

युद्धामुळे इराणच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेल आणि वायू प्रकल्प, पेट्रोकेमिकल उद्योग, स्टील आणि अ‍ॅल्युमिनियम कारखाने यांना फटका बसल्याने उत्पादन ठप्प झाले आहे. परिणामी, हजारो कामगारांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. याशिवाय, जानेवारीतील आंदोलनांदरम्यान झालेल्या इंटरनेट व्यत्ययांमुळे आणि 28 फेब्रुवारीपासून लागू असलेल्या इंटरनेट ब्लॅक आऊटमुळे डिजिटल अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. यामुळे आयटी आणि ऑनलाईन व्यवसाय क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे.

निम्म्या नोकर्‍या धोक्यात

इराणच्या सोशल सिक्युरिटी ऑर्गनायझेशनचे माजी अर्थतज्ज्ञ हादी काहलझादेह यांनी इशारा दिला आहे की, सुमारे 1 कोटी ते 1.2 कोटी नोकर्‍या धोक्यात आहेत, जे देशाच्या एकूण कामगारसंख्येच्या सुमारे 50 टक्के आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news