वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेसोबत झालेल्या चर्चेनंतर उत्तर कोरियाने आण्विक चाचणी कार्यक्रम बंद केल्याचे जाहीर केले होते. मात्र, वास्तवात तसे घडत नसल्याचे वृत्त अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आले आहेत. या यंत्रणांच्या हवाल्याने एनसीबी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने गुप्त ठिकाणी आण्विक शस्त्रे बनविण्यासाठी इंधन उत्पादनाचे काम सुरू केले आहे. मात्र, अमेरिकेच्या राज्य विभागाने या वृत्तावर मत व्यक्त करण्यास नकार दिला आहे. गुप्त यंत्रणांच्या अहवालावर मत व्यक्त करता येऊ शकत नाही, असे या विभागाने म्हटले आहे.