नोबेल पुरस्कार विजेते लेखक मारियो वर्गास लोसा यांचे निधन

Mario Vargas Llosa passes away | वयाच्या ८९ व्या वर्षी पेरू देशात निधन
Mario Vargas Llosa passes away
Mario Vargas Llosa passes away |नोबेल पुरस्कार विजेते लेखक मारियो वर्गास लोसा यांचे निधनfile photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mario Vargas Llosa passes away | नोबेल साहित्य पुरस्कार विजेते आणि लॅटिन अमेरिकन साहित्यातील दिग्गज पेरुव्हियन लेखक मारियो वर्गास लोसा यांचे रविवारी (दि. १३) निधन झाले. पेरू देशाची राजधानी लिमा येथे वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या नावावर ५० पेक्षा जास्त साहित्यकृती आहेत, ज्यातील अनेक भाषांतरित होऊन जगभर पोहोचल्या आहेत. २०१० मध्ये त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.

मारियो वर्गास लोसा यांचा जन्म १९३६ मध्ये दक्षिण पेरूमधील अरेक्विपा येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी लिमा विद्यापीठातून पदवी घेतली. द एस्केप ऑफ द इंका हे त्यांनी पहिले नाटक लिहिले. त्यांची पहिली कादंबरी 'द टाइम ऑफ द हिरो' ही पेरूमधील लष्करी शाळांमधील भ्रष्टाचार आणि अत्याचारांवर आधारित होती. ती १९६२ मध्ये प्रकाशित झाली. त्यावेळी देशाच्या राजकीय व सामाजिक जीवनावर लष्कराचा मोठा प्रभाव होता. या कादंबरीतील कठोर आणि धोकादायक प्रतिमांवर काही पेरुवियन जनरलांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्यानंतर १९६६ मध्ये त्यांनी दुसरी कादंबरी 'द ग्रीन हाऊस' लिहिली. या दोन्ही कादंबऱ्यांमुळे १९६० आणि १९७० च्या दशकातील लॅटिन अमेरिकन बूम साहित्यिक चळवळीला सुरुवात झाली.

द फेस्ट ऑफ द गोट्स ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे. २०१० मध्ये त्यांना साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले, तेव्हा परीक्षकांनी त्यांना "दैवी प्रतिभेचा गोष्टी सांगणारा" असे संबोधले. १९९० मध्ये पेरूच्या अध्यक्षपदासाठी त्यांनी निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांना अपयश आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news