

NASA astronaut Batman Halloween in space : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'च्या अंतराळवीर पेगी व्हिटसन यांनी बॅटमॅनच्या वेषभूषेत अंतराळात हॅलोविन साजरा केला. त्यांनी थेट अंतराळातून बॅटमॅनच्या पोशाखातील स्वतःचा फोटो शेअर करत सर्वांना हॅलोविनच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा हा सुपरहिरो अवतार सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
हॅलोविन हा ३१ ऑक्टोबर रोजी पाश्चात्त्य देशांमध्ये साजरा केला जाणारा एक सण आहे. या सणानिमित्त मृत आत्म्यांच्या स्मरणार्थ लोक भूतांसारखी विचित्र वेशभूषा करतात आणि मुले घरा-घरांमध्ये खाऊ गोळा करतात. नासाच्या अंतराळवीराने बॅटमॅनचा पोशाख घालून अंतराळात हॅलोविन साजरा केला
पेगी व्हिटसन यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये बॅटमॅनचा ड्रेस घातलेला फोटो पोस्ट करत लिहिले, "सर्वांना हॅलोविनच्या हार्दिक शुभेच्छा! अंतराळात सुपरहिरोची थीम आणि पोशाख निवडणे नेहमीच लोकप्रिय ठरते आणि त्यामागची कारणे तर अगदी उघड आहेत."
अंतराळातील शून्य गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणात सुपरहिरोसारखे तरंगणे सोपे असल्याने अंतराळवीरांमध्ये सुपरहिरो कॉस्च्युमची भुरळ नेहमीच पाहायला मिळते, असा हलकाफुलका संदेशही त्यांनी आपल्या या पोस्टमधून दिला आहे.
व्हिटसन यांच्या या खास 'बॅटमॅन' लूकमुळे यंदाच्या हॅलोविन उत्साहाला एक वेगळाच अंतराळ-रंग चढला असून जगभरातून त्यांच्या या फोटोवर नेटिझन्सकडून मजेशीर कमेंट्स आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.