NASA Mars discovery | मंगळावर सापडला संभाव्य जीवसृष्टीचा पुरावा : नासा

NASA Mars discovery |
NASA Mars discovery | मंगळावर सापडला संभाव्य जीवसृष्टीचा पुरावा : नासा
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन : मंगळ ग्रहावर कोट्यवधी वर्षांपूर्वी जीवसृष्टी अस्तित्वात होती का, या शतकानुशतके अनुत्तरित राहिलेल्या प्रश्नाचे उत्तर एका अनोख्या खडकामध्ये दडलेले असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नासाच्या ‘पर्सिव्हरन्स’ रोव्हरने गोळा केलेला बिबट्यासारखे ठिपके असलेला एक दगड सध्या एका नळीत सुरक्षित ठेवला असून, तो मंगळावरून पृथ्वीवर आणण्याची शास्त्रज्ञ वाट पाहत आहेत.

या खडकाच्या नमुन्याला ‘सॅफायर कॅनियन’ असे नाव देण्यात आले आहे. साधारण एका खडूच्या आकाराचा हा खडक एका प्राचीन नदीच्या खोऱ्यात (नेरेत्वा व्हॅलिस) सापडला आहे. तीन अब्ज वर्षांपूर्वी या भागात पाण्याचे मोठे प्रवाह वाहत होते. पृथ्वीवर मातीमध्ये सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थ पचवतात तेव्हा अशाच प्रकारचे विशिष्ट रासायनिक डाग किंवा ठिपके तयार होतात. त्यामुळे शास्त्रज्ञ या शोधाला मंगळावरील पहिला ‘संभाव्य बायोसिग्‍नेेचर’ (जीवसृष्टीचा रासायनिक पुरावा) मानत आहेत.

नासाची मोहीम रद्द

रोव्हरवरील मर्यादित उपकरणांद्वारे यावर अंतिम शिक्कामोर्तब करणे अशक्य आहे. त्यासाठी हा नमुना पृथ्वीवरील अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये तपासणे गरजेचे आहे; मात्र नासा आणि युरोपीय अंतराळ संस्थेचा ‘मार्स सॅम्पल रिटर्न’ प्रकल्प प्रचंड खर्च (सुमारे ११ अब्ज डॉलर्स) आणि गुंतागुंतीच्या रचनेमुळे रद्द करण्यात आला आहे. आता नासा खासगी कंपन्यांच्या मदतीने कमी खर्चात हे नमुने परत आणण्याचे नवे पर्याय शोधत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news