म्यानमारमध्ये 20 तर बँकॉकमध्ये 3 ठार; भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल

Myanmar Earthquake Updates: म्यानमार-बँकॉकमध्ये 'आपत्कालीन स्थिती' जाहीर; भूकंपाची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल
Myanmar Earthquake Updates:
Myanmar Earthquake Updates:PTI
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: आग्नेय आशियातील म्यानमारमध्ये स्तानिक वेळेनुसार शुक्रवारी दुपारी 12.50 वाजता शक्तीशाली भूकंप झाला. भूकंपाचे एकूण 6 धक्के बसले. यातील सर्वात मोठा भूकंप 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.

या भूकंपाचे धक्के थायलंड, चीन, भारत, व्हीएतनाम आणि बांग्लादेशातही जाणवले. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) नुसार, या भूकंपाचे केंद्र म्यानमारमध्ये सगाईंग शहरापासून 16 किमी अंतरावर 10 ते 30 किलोमीटर खोलीवर होते.

हे ठिकाण म्यानमारची राजधानी नेपीडॉपासून सुमारे 250 किमी अंतरावर आहे. दरम्यान, रात्री 8 पर्यंत या भुकंपातील मृतांची संख्या 23 वर गेली होती. (Myanmar Earthquake Updates)

म्यानमारमध्ये 'आपत्कालीन स्थिती' जाहीर

म्यानमारची राजधानी नेपीडॉ येथील रुग्णालयात "मोठ्या संख्येने मृत्यू" झाल्याचा अंदाज आहे. शिवाय मंडाले शहरातील एका मशिदीचा काही भाग कोसळल्याने तेथे मृत्यू झाल्याची शक्यता आहे. तर विद्यापीठात लागलेल्या आगीमुळे काही विद्यार्थी अडकले असल्याचे समजते.

म्यानमारमध्ये 20 मृत्यू झाल्याचे समजते. म्यानमारचे लष्कर प्रमुख मिन आंग ह्लाइंग यांनी आपत्कालीन स्थिती जाहीर करत मदतीसाठी साकडे घातले आहे.

बँकॉकमध्ये तीव्र धक्के

थायलंडमधील बँकॉकमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. त्यामुळे काही मेट्रो आणि रेल्वे सेवा थांबवण्यात आल्या. थायलंडच्या पंतप्रधान पॅटोंगटार्न शिनावात्रा यांनी आपत्कालीन बैठक घेतली आणि बँकॉकमध्येही 'आपत्कालीन स्थिती' लागू केली. बँकॉकमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

चीन आणि भारतातही धक्के

चीनच्या युन्नान प्रांतातही जोरदार भूकंप जाणवला. चीनच्या भूकंप नेटवर्क सेंटरने त्याची तीव्रता 7.9 असल्याचे सांगितले. कोलकाता आणि मणिपूरमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मणिपूरमध्ये 4.4 तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला. बांगलादेशमधील ढाका आणि चट्टोग्राममध्येही धक्के जाणवले.

भारताने पुढे केला मदतीचा हात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमारसाठी मदतीची तयारी दर्शवली."सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो... मदतीसाठी आमचे अधिकारी तत्पर आहेत," असे मोदींनी म्हटले आहे. तर युरोपियन राष्ट्रांनीही मदतीसाठी तत्परता दर्शवली आहे.

भूकंपाचे थरारक क्षण

  • बँकॉकमध्ये इमारती हलताना दिसणारी भीतीदायक दृश्ये व्हायरल झाली

  • एका इन्फिनिटी पूलमधून पाणी पडतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर झाला

  • बँकॉकच्या चाटुचाक परिसरातील 30 मजली इमारत कोसळली, 84 कामगार अडकले

  • तीन मृतदेह बाहेर काढले. पोलिसांच्या मते शेकडो लोक जखमी झाल्याची शक्यता

म्यानमारमधील विनाश

  • राजधानीतील रुग्णालयात शेकडो जखमी दाखल

  • आयारवाडी नदीवरील जुना पूल आणि अनेक निवासी इमारती कोसळल्या

  • म्यानमारमधील श्वे सार यान पॅगोडा कोसळला

  • मंडाले विमानतळाचेही नुकसान

  • मंडाले आणि यांगून दरम्यानचे रस्ते खराब झाल्याने मदतकार्यात अडचणी

म्यानमारमधील यापुर्वीचे भूकंप

  • म्यानमारमध्ये 1930 ते 1956 दरम्यान 7 रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचे 6 मोठे भूकंप झाले

  • 2016 मध्ये बागान शहरात 6.8 तीव्रतेच्या भूकंपामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आणि प्राचीन मंदिरे कोसळली होती

Myanmar Earthquake Updates:
बिल गेट्स म्हणतात, AI च्या आक्रमणात केवळ 'हे' तीन जॉब सुरक्षित

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news