ट्रम्प यांच्या विरोधात 80 हून अधिक संघटनांनी कंबर कसली

ट्रम्प यांच्या विरोधात 80 हून अधिक संघटनांनी कंबर कसली

न्यूयॉर्क, वृत्तसंस्था : अमेरिकेत 5 नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी अवघ्या काही महिन्यांचा कालावधी बाकी आहे. सध्या रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर आघाडी घेतली आहे. ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत असतील, तर मग सत्तेवर आल्यानंतर ते अमेरिकेतील लोकशाही संपुष्टात आणतील, अशी अनेकांना भीती वाटत आहे. यातूनच अमेरिकेतील 80 हून अधिक संघटनांनी ट्रम्प यांच्या संभाव्य कारकिर्दीच्या विरोधात आतापासूनच कंबर कसली आहे.

अमेरिकन लोकशाही वाचवण्यासाठी ते सुरक्षा कवच तयार करण्याच्या तयारीला लागले आहेत. ट्रम्प यांच्या विरोधात विरोधी गटात अनेक डेमोक्रॅटिक अधिकारी, समाजसेवकासह, रिपब्लिकन पक्षाच्या अनेक नेत्यांचा समाचेश आहे. ट्रम्प सत्तेवर आल्यास अमेरिका देशाला धोका निर्माण होईल, असे या गटाला वाटत आहे. ट्रम्प यांच्या स्थलांतर धोरणाच्या विरोधात 50 पेक्षा अधिक संघटनांनी फिनिक्समध्ये इमिग्रेशन मुव्हमेंट व्हिजनच्या अंतर्गत तीन दिवसीय बैठक घेतली. यात ट्रम्प यांच्या स्थलांतरसंबंधी धोरणाला विरोध करण्यासाठी कोणती पावले उचलली जावी, यावर चर्चा झाली आहे.

2016 मध्ये ट्रम्प यांच्या विजयानंतर त्यांच्या योजनांना विरोध करण्यासाठी डेमोक्रॅसी फॉरवर्ड संस्थेची स्थापना केली. या संस्थेने ट्रम्प यांच्या मागील अनेक निर्णयांना आव्हान दिले होते. याच संस्थेने त्यांच्या विजयाची शक्यता लक्षात घेऊन 15 पानांचे एक मॅट्रिक विकसित केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news