

मोहम्मद युनूसच्या राजवटीत बांगलादेशमध्ये अराजकता वाढतच असल्याचे चित्र आहे. देशाच्या राष्ट्रगीताचे निर्माते रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांच्या वडिलोपार्जित घरात दंगलखोरांनी तोडफोड केली आहे. तसेच यावेळी धुडगूस घालणार्या जमावाने रवींद्रनाथ टागोर यांच्याविरोधात अपमानास्पद घोषणाबाजी केल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. जमावात जमात-ए-इस्लामी आणि हेफाजत-ए-इस्लामशी संबंधित लोकांचा समावेश असल्याचा संशय आहे.
शाहजहांपूर येथील टागोरांना समर्पित संग्रहालयात एका पर्यटकाचे पार्किंगवरून संग्रहालय कर्मचाऱ्यांशी भांडण झाले. कर्मचाऱ्यांनी त्याला ओलीस ठेवल्याचा आरोप झाला. त्यानंतर स्थानिक लोक मोठ्या संख्येने जमले. त्यांनी निषेध करण्यास सुरुवात केली. निदर्शनानंतर जमाव रवींद्र कचरीबारी संकुलात जबरदस्तीने घुसला. रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलोपार्जित घरावर हल्ला केला. येथे तोडफोडही केली.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, जमावात जमात-ए-इस्लामी आणि हेफाजत-ए-इस्लामशी संबंधित लोकांचा समावेश असल्याचा आरोप आहे. या हल्लेखोरांनी टागोर यांच्याविरुद्ध अपमानास्पद घोषणा दिल्या आणि एका कर्मचाऱ्यावरही हल्ला केला. हिंसाचारानंतर पुरातत्व विभागाने एक चौकशी समिती स्थापन केली आहे. समितीला पाच दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच हे ऐहिासिक स्थळ सध्या बंद करण्यात आले आहे.
देशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारला कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. सुरक्षा व्यवस्था कोलमडली आहे. पोलिसांनी राजधानी ढाकाच्या अनेक प्रमुख भागात सार्वजनिक सभा घेण्यास बंदी घातली आहे.
ारताचे तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी १९ जुलै १९०५ मध्य बंगालच्या फाळणीची घोषणा केली होती. ब्रिटिशांनी धर्माच्या आधारावर ही फाळणी केली होती. यावेळी रवींद्रनाथ टागोर यांनी "अमर सोनार बांग्ला" हे गीत लिहिले होते. हे गाणे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत लिहिले होते. सर्व लोक बंगालवर समान प्रेम करतात, असा संदेश देण्याचा प्रयत्न या गीताने केला. बांगलादेशच्या निर्मितीनंतर १९७१ मध्ये या गाण्याच्या पहिल्या १० ओळी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारल्या गेल्या. या गीताच्या पहिल्या ओळी पहिल्यांदा सप्टेंबर १९०५ मध्ये 'बंगदर्शन' नावाच्या मासिकात प्रकाशित झाल्या.