Yunus On Sheikh Hasina : "PM मोदींबरोबर चर्चा झाली, पण..." : युनूस यांनी पुन्‍हा एकदा आळवला भारताविरुद्ध 'राग'

म्‍हणे, आमच्‍याविरोधात सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून चुकीचा प्रचार
 Yunus On Sheikh Hasina
प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo
Published on
Updated on

Yunus On Sheikh Hasina : बांगलादेशमध्‍ये सत्तांतरानंतर अंतरिम सरकारचे मुख्‍य सल्‍लागार मोहम्‍मद युनूस हे वारंवार भारताविरोधातील व्‍देष व्‍यक्‍त करत आले आहेत. बुधवारी लंडन येथील एका कार्यक्रमात त्‍यांनी पुन्‍हा एकदा भारताविरुद्ध राग आळवला. यावेळी त्‍यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा उल्‍लेखही केला.

मी तुम्‍हाला तुमचे धोरण सोडण्‍यास भाग पाडू शकत नाही....

लंडन येथील चॅथम हाऊस येथे एका कार्यक्रमात बोलताना मोहम्‍मद युनूस म्‍हणाले की, मला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याशी बोलण्‍याची संधी मिळाली. तेव्‍हा मी म्‍हटलं होतं की, बांगलादेशच्‍या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे तुम्‍ही भारतात स्‍वागत करु शकता कारण हा तुमच्‍या धोरणाच भाग आहे. मी तुम्‍हाला तुमचे धोरण सोडण्‍यास भाग पाडू शकत नाही; परंतू शेख हसीना बांगलादेशमधील जनतेबाबत ज्या पद्धतीने बोलत आहेत त्‍यावर प्रतिबंध करावा. शेख हसीना यांनी भारतात राहून केलेल्या विधानांमुळे बांगलादेशमध्ये असंतोष पसरला. बांगलादेशमध्‍ये प्रक्षोभक होईल, अशी विधान करण्‍यापासून त्‍यांना रोखावे. यासाठी आम्‍हाला मदत करावी, अशी विनंती पंतप्रधान मोदींना केली होती.

 Yunus On Sheikh Hasina
‘भारत-बांगलादेश सीमेच्या ३२३२.२१८ किमी क्षेत्रावर कुंपण घातले’

पंतप्रधान मोदींनी दिला सोशल मीडियाचा हवाला

शेख हसीना यांच्‍या बोलण्‍यावर प्रतिबंध करावा, अशी मागणी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍याकडे केली;परंतु त्यांनी सोशल मीडियाचा हवाला देऊन नकार दिला. भारतीय पंतप्रधानांनी उत्तर दिले की, 'हे सोशल मीडिया आहे, तुम्ही ते नियंत्रित करू शकत नाही.' यावर 'तुम्ही काय म्हणू शकता? ही एक स्फोटक परिस्थिती आहे, तुम्ही हे सोशल मीडिया आहे असे सांगून या प्रश्‍नातून स्‍वत:ची सुटका करु शकत नाही , असेही आपण म्‍हटलं होतं, असा दावा त्‍यांनी केला.

 Yunus On Sheikh Hasina
'अल्लाहने मला एका कारणासाठी जिवंत ठेवले आहे, मी परत येईन': शेख हसीना यांची समर्थकांना ग्‍वाही

भारत बांलगादेशच्‍या अपेक्षेप्रमाणे काहीच करत नाही...

भारत बांगलादेशच्या अपेक्षेप्रमाणे करत आहे का, या प्रश्‍नावर बोलताना त्‍यांनी कोणताही संकोच न करता नाही, असे उत्तर दिले. बांगलादेशने शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारला पत्र लिहिले आहे.कायदेशीर कार्यवाही आधीच सुरू आहे, असे सांगत आम्हाला भारतासोबत सर्वोत्तम संबंध निर्माण करायचे आहेत. ते आमचे शेजारी आहेत. आम्हाला त्यांच्यासोबत कोणतीही मूलभूत समस्या नको आहे. परंतु प्रत्येक वेळी गोष्टी चुकीच्या होतात कारण खूप खोटा प्रचार पसरवला जातो, असा दावाही मोहम्‍मद युनूस यांनी केला.

 Yunus On Sheikh Hasina
शेख हसीना यांना बांगला देशला परत पाठवा : अंतरिम सरकारची भारताकडे मागणी

शेख हसीना यांच्‍याविरुद्ध रागाच्‍या भरात कारवाई करायची नाही...

"न्यायाधिकरणाने सुनावणी प्रक्रिया सुरू केली आहे. शेख हसीना यांना त्‍यांनी केलेल्या गुन्ह्यांसाठी नोटिसा पाठवल्या आहेत. अजून बरेच गुन्हे नोंदवणे बाकी आहे. त्‍यांना सर्व कायदेशीर नोटिसांना उत्तर द्यावे लागेल. आम्ही कायदेशीर प्रक्रियेचे अनुसरण करत आहोत. आम्हाला कायदेशीर, पूर्णपणे निष्पक्ष हवे आहे. रागाच्या भरात आम्‍हाला चुकीची कारवाई करायची नाही, असेही ते म्‍हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news