

हैदराबाद : येथे झालेल्या एका ग्रँड समारंभात यंदाची मिस वर्ल्ड होण्याचा मान थायलंडची सुंदरी ओपल सुचाता चॉगंश्री (Opal Suchata Chuangsri) हिने पटकावला. हैदराबादच्या HITEX कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा अंतिम सोहळा पार पडला. ७ मे पासून याठिकाणी हा सोहळा सुरु होता. इथोपियाच्या हसाते ड्रिजे अडमासू ही यंदाची रनर अप ठरली आहे.इथोपियाच्या हसाते ड्रिजे अडमासू (Hasset Dereje Admassu) ही यंदाची रनर अप ठरली आहे. पोलंडची माजा क्लाजदा (Maja Klajda) हिने तिसरे स्थान पटकावले.
या जागतिक सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी 21 वर्षांची नंदिनी गुप्ता सेमीफायनल्समध्ये पोहोचली होती पण तिला विजेतेपद मिळवता आले नाही. गेले २५ दिवस या स्पर्धा पार पडल्या भारतात मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेची सुरुवात 7 मे 2025 रोजी झाली होती आणि आज, 31 मे 2025 रोजी हैदराबादच्या HITEX कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 72व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा अंतिम सोहळा पार पडला .
यंदा 108 देशांतील सौंदर्यवतींनी या जागतिक स्पर्धेत भाग घेतला होता. 2024 मधील विजेती क्रिस्टिना पायझकोव्हा (चेक रिपब्लिक) आपली उत्तराधिकारी निवडणार आहे.