ट्रम्प ॲक्शन मोडमध्ये! अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी माइक वॉल्ट्ज यांची निवड

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून निवड
mike waltz appointed us national security advisor
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी माइक वॉल्ट्ज यांची निवडPudhari photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यापासून डोनाल्ड ट्रम्प ॲक्शन मोडमध्ये काम करत आहेत. ट्रम्प यांनी चीनला कोंडीत पकडण्याची योजना सुरू केल्याचे चित्र आता दिसत आहे. याचे कारण म्हणजे ट्रम्प यांनी त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून रिपब्लिकन प्रतिनिधी माइक वॉल्ट्ज यांची निवड केली आहे. अशी माहिती वृत्तसंस्था 'रॉयटर्स'ने दिली आहे. वॉल्ट्झ हे यूएस आर्मीचे निवृत्त ग्रीन बेरेट आहेत, जे चीनचे प्रमुख टीकाकार आहेत. वॉल्ट्ज नॅशनल गार्डमध्ये कर्नल म्हणून कार्यरत आहेत.

mike waltz appointed us national security advisor
अविश्वसनीय! डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून विजयाची घोषणा; मानले अमेरिकेतील जनतेचे आभार

डोनाल्ड ट्रम्पचे एकनिष्ठ असलेले वॉल्ट्झ यांनी नॅशनल गार्डमध्ये कर्नल म्हणूनही काम केले आहे. ते आशिया-पॅसिफिकमधील चिनी क्रियाकलापांचे कठोर टीकाकार आहेत. त्यांनी या प्रदेशातील संभाव्य संघर्षासाठी अमेरिकेने तयारी करण्याची गरज व्यक्त केली आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे एक शक्तिशाली पद आहे, ज्याला सिनेटच्या पुष्टीकरणाची आवश्यकता नाही. प्रमुख राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर ट्रम्प यांना माहिती देण्यासाठी आणि विविध एजन्सींशी समन्वय साधण्यासाठी वॉल्ट्ज जबाबदार असतील.

, ,, ,,,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news