Microsoft Layoffs | 'मायक्रोसॉफ्ट'मध्ये नोकरकपात सुरुच, आणखी ३०० जणांना नारळ, काय आहेत कारणे?

टेक क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांत नोकरकपात सुरुच
Microsoft Layoffs
Microsoft Layoffs (file photo)
Published on
Updated on

Microsoft Layoffs

टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने नोकर कपातीची नवीन फेरी सुरु केली आहे. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, २ जून रोजी कंपनीतील सुमारे ३०० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. या वर्षी मे महिन्यात मायक्रोसॉफ्टने ६ हजार नोकरकपातीची घोषणा केली होती. आताची ही नवीन नोकरकपात आहे.

याआधी जाहीर केलेल्या नोकरकपातीचा कंपनीतील सॉफ्टवेअर अभियंत्यांना सर्वाधिक फटका बसला होता. आता नुकत्याच केलेल्या नोकरकपातीचा कोणत्या विभागांवर परिणाम झाला आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जून २०२४ पर्यंत, मायक्रोसॉफ्टमध्ये सुमारे २ लाख २८ हजार पूर्णवेळ काम करणारे कर्मचारी होते. त्यातील बहुतांश म्हणजे ५५ टक्के कर्मचारी अमेरिकेतील आहेत.

Microsoft Layoffs
AI Misuse: महिला खासदाराने संसदेत सर्वांसमोर दाखवला AI जनरेटेड फोटो, खासदारांसह सगळेच हादरले, नेमकं काय घडलं?

"गतिमान बाजारपेठेत कंपनीच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असलेले संघटनात्मक बदल आम्ही अंमलात आणत आहोत," असे ब्लूमबर्गने मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

Microsoft Layoffs
Amazon layoffs | 'मायक्रोसॉफ्ट'नंतर आता 'अ‍ॅमेझॉन'मध्ये नोकरकपात, 'इतक्या' कर्मचाऱ्यांना नारळ, काय सांगितले कारण?

नोकरकपातीची कारणे काय?

ही नोकरकपात मायक्रोसॉफ्ट आणि मेटा सारख्या दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांतील मोठ्या प्रमाणात बदल दर्शवते. त्यांनी डेटा सेंटर्स आणि AI वर गुंतवणूक आणि संसाधने वाढवली आहेत. हे करत असताना ते त्यांच्या कामकाजाच्या इतर क्षेत्रात खर्च कपात करत आहेत.

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रक्रियेचा काही भाग स्वयंचलित करण्यास सक्षम असलेल्या AI कोडिंग टूल्सवर भर दिला जात आहे. नोकरकपातीचे हेदेखील एक कारण आहे. मायक्रोसॉफ्टमधील अभियंते कंपनीच्या प्रकल्पांतील कोड लिहिण्यासाठी २० ते ३० टक्के एआयचा वापर करत आहेत, असे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी गेल्या महिन्यात मेटाच्या एका परिषदेत सांगितले होते.

सत्या नडेला यांनी, नॉन-एआय अझ्यूर क्लाउडमधून महसूलात अपेक्षेपेक्षा कमी वाढ मिळाल्यानंतर कंपनी विक्री कार्यवाहीत बदल करेल, असेही संकेत याआधी दिले होते.

मायक्रोसॉफ्टने मे महिन्यात जागतिक स्तरावरील कर्मचाऱ्यांपैकी ३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याची घोषणी केली होती. या फेरीत सुमारे ६ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश होता. परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टीममध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांच्या पार्श्वभूमीवर ही नोकरकपात लागू करण्यात आली होती. दरम्यान, कंपनीने कामगिरीच्या आधारावर काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्षांची पुनर्भरती बंदी लागू केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news