Child Safety Lawsuit | अमेरिकेत मेटाला ५,३९० कोटींचा दंड

अल्‍पवयीनांच्या मानसिक आरोग्य सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्‍याचा ठपका
Child Safety Lawsuit |
Child Safety Lawsuit | अमेरिकेत मेटाला ५,३९० कोटींचा दंड
Published on
Updated on

वॉशिंग्‍टन; पुढारी वृत्तसेवा : इन्स्टाग्राम व फेसबुकची पालक कंपनी असलेल्‍या मेटाला अमेरिकेतील न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. न्यू मेक्सिकोच्या न्यायालयाने मेटाला तब्‍बल ५६७ मिलियन डॉलर्स (सुमारे ५ हजार ३९० कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. मुलांच्या मानसिक आरोग्याला नुकसान पोहोचवणे आणि सुरक्षेचे नियम डावलल्याचा ठपका या कंपनीवर ठेवण्‍यात आला आहे.

मेटा कंपनीने मुलांच्या सुरक्षेपेक्षा स्वतःच्या नफ्याला प्राधान्य दिले, ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला, असे न्या. ब्रायन बिडचेड यांनी निकालात स्पष्ट केले. दंडाच्या रकमेतील मोठा हिस्सा तरुणांच्या उपचारासाठी वापरला जाईल, तर उर्वरित रक्कम पुढील पाच वर्षांत जनजागृती, प्रतिबंध, स्क्रीनिंग सेवा आणि इतर कामांवर खर्च केली जाईल, असेही न्‍यायालयाने म्‍हटले आहे. अमेरिकेतील कोणत्याही राज्याने एखाद्या मोठ्या टेक कंपनीविरुद्ध अशी कठोर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news