Meta settlement : मुलांना सोशल मीडियाचे व्यसन लावले? चौफेर घेराबंदीनंतर 'मेटा' झुकली; आता भरणार १६.६८ अब्ज डॉलर्सची रक्कम!

फेसबुक आणि इंस्टाग्रामवर दैनंदिन वापराच्या मर्यादा आणि नाईटटाइम ब्लॉक फीचर्स लागू केली जाणार

Meta Teen safety settlement
Meta Teen safety settlement Pudhari
Published on
Updated on
Summary

अमेरिकेतील २९ राज्यांचा समावेश असलेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान तडजोड करार

कोणत्याही प्रकारची चूक केली नसल्‍यावर 'मेटा' ठाम

प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये मेटाच्या शेअर्समध्ये ४.४% वाढ

Meta Teen safety settlement : मुलांना आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे व्यसन लावले, त्यांच्या सुरक्षिततेबाबत जनतेची दिशाभूल केली आणि संमतीशिवाय माहिती (डेटा) गोळा केली, अशा आरोपांवरून दाखल झालेले खटले मिटवण्यासाठी 'मेटा प्लॅटफॉर्म्स' (Meta Platforms) १६.६८ अब्ज डॉलर्स (सुमारे १.४० लाख कोटी रुपये) देण्यास सहमत झाली आहे. कॅलिफोर्नियातील फेडरल न्यायालयात २९ राज्यांनी दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान हा करार झाला असून, यानुसार, मेटाला आता फेसबुक आणि इंस्टाग्रामवर किशोरवयीन वापरकर्त्यांसाठी 'दैनंदिन वापराची मर्यादा' (daily usage limits) आणि 'रात्रीच्या वेळी वापरण्यावर निर्बंध' (nighttime usage blocks) यांसारखी वैशिष्ट्ये लागू करावी लागतील.

मेटाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले

न्यायालयीन कागदपत्रांनुसार, या तडजोडीनंतरही मेटाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले असून कोणतीही चुकीची कृती केल्याचे मान्य केलेले नाही. तथापि, कंपनीने अमेरिकेतील किशोरांसाठी (टीनेजर्स) फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरावर दैनंदिन मर्यादा (Daily Limits) आणि रात्रीच्या वेळी वापरावर निर्बंध (Overnight Restrictions) यांसारखे महत्त्वाचे बदल लागू करण्याचे मान्य केले आहे. या कराराच्या वृत्तानंतर प्री-मार्केट ट्रेडिंगमध्ये मेटाचे शेअर्स ४.४ टक्क्यांनी वधारले.

अल्‍पवयीन मुलांच्‍या सुरक्षेसाठी नियमावलीत मोठे बदल

या करारानुसार केवळ आर्थिक दंड भरून मेटाची सुटका होणार नसून, कंपनीला आपल्या प्लॅटफॉर्मच्या कार्यपद्धतीत मोठे बदल करावे लागणार आहेत. मुले आणि किशोरांचा सोशल मीडियावर जास्तीत जास्त वेळ जावा यासाठी वापरल्या जाणाऱ्या फीचर्सवर यापुढे कडक मर्यादा असतील.यापूर्वी मेटाने न्यायालयासमोर दावा केला होता की, "सोशल मीडियाचे व्यसन" ही कोणतीही मान्यताप्राप्त मानसिक वैद्यकीय स्थिती नाही, त्यामुळे युजर्सची दिशाभूल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु वाढता न्यायालयीन दबाव आणि लाखो डॉलर्सच्या संभाव्य दंडाच्या पार्श्वभूमीवर अखेर मेटाने तडजोडीचा मार्ग स्वीकारला.


Meta Teen safety settlement
High Court : "एकदा योगायोग, पण तीनदा...": जेम्स बाँडचा 'तो' डायलॉग अन् न्यायमूर्तींकडून हायकोर्टात वकिलाची 'झाडाझडती'!

कोट्यवधी डॉलर्सच्या दंडाचा धोका टळला

कॅलिफोर्निया, कोलोरॅडो, केन्टकी आणि न्यू जर्सी या राज्यांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या उल्लंघनाबाबत हा खटला दाखल केला होता. याशिवाय २९ राज्यांनी असाही आरोप केला होता की, पालकांच्या संमतीशिवाय मुलांचा डेटा गोळा करून त्याचा वापर एआय (AI) मॉडेल्सच्या प्रशिक्षणासाठी करण्यात आला. या खटल्यात मेटावर तब्बल १.४ ट्रिलियन डॉलर्सपर्यंतचा दंड ठोठावला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. या तडजोडीमुळे मेटासमोरील मोठा न्यायालयीन लढा सध्या टळला आहे.


Meta Teen safety settlement
Bill Gates AI warning : 'AI'बाबत बिल गेट्स यांचं मोठं विधान; "माणसांसाठी ४०% नोकऱ्या राखीव ठेवा, अन्यथा..."

इतर सोशल मीडिया कंपन्यांसमोरील अडचणी कायम

मेटाने केलेला हा करार म्हणजे सोशल मीडिया कंपन्यांविरोधातील न्यायालयीन लढ्याचा शेवट नाही. मेटा, स्नॅप (Snap), यूट्यूब (YouTube) आणि टिकटॉक (TikTok) या कंपन्यांवर अजूनही अमेरिकाभरातील विविध न्यायालयांमध्ये हजारो खटले प्रलंबित आहेत. पालक, शाळा आणि राज्य सरकारांनी या कंपन्यांवर मुलांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आगामी काळात सोशल मीडिया कंपन्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news