Viral Video :'फ्री स्पीच'च्या नावाखाली ऑस्‍ट्रेलियात भारतीय संस्कृतीचा उघड द्वेष; मेलबर्नमधील दिवाळी कार्यक्रमावेळी निदर्शने

Melbourne Diwali protest viral video : घटनेचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल

Melbourne Diwali protest viral video
फ्री स्पीच'च्या नावाखाली ऑस्‍ट्रेलियात मेलबर्नमधील दिवाळी कार्यक्रमावेळी निदर्शने करण्‍यात आली.
Published on: 
Updated on: 

Melbourne Diwali protest viral video : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरातील 'फेडरेशन स्क्वेअर' येथे आयोजित दिवाळी उत्सवादरम्यान काही स्थानिक नागरिकांनी केलेल्या भारतविरोधी निदर्शन केली. या घटनेचा एक व्हिडीओ 'krishnabookspov' या इंस्टाग्राम पेजवरून पोस्ट करण्यात आला असून, यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर ऑस्‍ट्रेलियातील नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की द्वेषयुक्त भाषण असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दिवाळीच्‍या आनंदोत्सव सुरू असतानाच निदर्शकांची जोरदार घोषणाबाजी

'krishnabookspov' या इंस्टाग्राम पेजवरील व्‍हिडिओनुसार, मेलबर्नमध्‍ये दिवाळीचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि आनंदोत्सव सुरू असतानाच काही निदर्शकांनी स्टेजजवळ येऊन मोठ्या लाउडस्पीकरवर जोरदार घोषणाबाजी सुरू केली.


Melbourne Diwali protest viral video
Viral Video: महिलेने ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबला अन् भरधाव एसयूव्ही थेट कबाब सेंटरमध्ये घुसली, व्हिडीओ व्हायरल

तर आपला देश 'ऑस्ट्रेलिया' राहणार नाही...

"आम्ही ऑस्ट्रेलियात परदेशी ध्वज फडकवणे, परकीय विचारसरणी आणि परकीय धर्मांचा प्रसार करणे स्वीकारणार नाही. आपण अमर्याद भारतीयांना या देशात येऊ दिले, तर आपला देश 'ऑस्ट्रेलिया' राहणार नाही," अशी आक्षेपार्ह फलक आणि वक्तव्ये निदर्शकांकडून केली गेल्‍याचे व्‍हायरल व्‍हिडिओमुळे स्‍पष्‍ट झाले.

पोलीस अधिकार्‍यांना विचारण्‍यात आला जाब

आनंदाच्या वातावरणात अचानक झालेल्या या प्रकारामुळे भारतीय समुदायामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी उपस्थित एका दांपत्याने या निदर्शनांवर तीव्र आक्षेप घेतला आणि तेथे तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांकडे जाब विचारला. या लोकांना येथे कायदेशीररित्या निदर्शने करण्याची परवानगी कशी दिली जाऊ शकते? ही कसली पद्धत आहे?", असा सवालही पोलिस अधिकार्‍यांना विचारण्‍यात आला.


Melbourne Diwali protest viral video
Metro Viral video : "मी अक्षरशः थरथर कापत होते...": मेट्रोत व्हिडिओ शूट करणाऱ्या सहप्रवाशाला तरुणीने रंगेहात पकडले

पोलिस अधिकार्‍यांनीही घेतली बघ्‍याची भूमिका

पोलीस अधिकारी: "सध्या आमच्याकडे यावर कोणतीही कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. ती एक सार्वजनिक जागा (Public Space) आहे आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांना निदर्शने करण्याचा अधिकार आहे. यासाठी कोणत्याही विशेष परवानगीची ) गरज नसते, असा दावा केला. एखाद्याच्या सण-उत्सवाच्या वेळी मोठ्या लाउडस्पीकरचा वापर करून असा गोंधळ घालण्याची परवानगी कशी असू शकते? या सवालावर मात्र पोलीस अधिकारी अनुत्तरीत झाले.

ही तर थेट दादागिरी

या घटनेवर प्रतिक्रिया देताना ऑस्‍ट्रेलियातील स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. " अशा प्रकारे आशियाई लोकांना लक्ष्य करून असा द्वेष पसरवणे अत्यंत घृणास्पद आहे. दिवाळी हा दिव्यांचा आणि आनंदाचा सण आहे, जो अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो. अशा सांस्कृतिक कार्यक्रमात असे कृत्य करणे म्हणजे थेट दादागिरी आणि द्वेष पसरवणे आहे," अशी प्रतिक्रिया तेथील उपस्थितांनी दिली.


Melbourne Diwali protest viral video
Fake Video Viral : 'विधानसौध' बॉम्बस्फोट AI-जनरेटेड व्हिडिओप्रकरणी बंगळुरूमध्‍ये बिहारी तरुणाच्‍या आवळल्‍या मुसक्‍या

ज्ञानी आणि नम्र सर्वांकडे समान दृष्टीने पाहतात...

भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, "जे ज्ञानी आणि नम्र आहेत, ते खऱ्या ज्ञानामुळे सर्वांकडे समान दृष्टीने पाहतात." (भगवद्गीता ५.१८) श्रील प्रभुपाद आपल्या तात्पर्य भाष्यात स्पष्ट करतात की, "एका ज्ञानी आध्यात्मिक व्यक्तीच्या दृष्टिकोनातून शरीरातील हे भेद अर्थहीन आहेत,"कारण प्रत्येक हृदयात तोच परमात्मा वास करतो. मग व्यक्ती कृष्णवर्णीय असो किंवा तपकिरी रंगाची, त्यांच्यातील आत्मा एकच असतो. रंगावरून किंवा धर्मावरून लोकांचे मूल्यमापन करणे हाच खरा अंधकार आहे; आणि दिवाळीचे दिवे तसेच भगवद्गीतेतील ज्ञान, हाच अंधकार दूर करण्यासाठी आहेत, असेही 'krishnabookspov' या इंस्टाग्राम पोस्‍टमध्‍ये नमूद करण्‍यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.