Maldives tobacco ban: जनरेशनल धूम्रपान बंदी करणारा मालदीव जगातील पहिला देश; हा कायदा आहे तरी काय?

समुद्रकिनाऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या मालदीवने आता एका महत्त्वपूर्ण आरोग्य धोरणाद्वारे जागाचे लक्ष वेधले आहे.
Maldives tobacco ban
Maldives tobacco banfile photo
Published on
Updated on

Maldives tobacco ban:

मालदीव : समुद्रकिनाऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या मालदीवने आता एका महत्त्वपूर्ण आरोग्य धोरणाद्वारे जागाचे लक्ष वेधले आहे. मालदीव सरकारने १ जानेवारी २००७ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या कोणत्याही नागरिकाला तंबाखूचे सेवन करण्यावर, खरेदी-विक्री करण्यावर पूर्ण बंदी घातली आहे. यामुळे, देशभरात 'जनरेशनल तंबाखू बंदी' (generational tobacco prohibition) लागू करणारा मालदीव हा जगातील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे.

सरकारचा तरुण पिढीला तंबाखूपासून वाचवण्याचा संकल्प

आरोग्य मंत्रालयाने शनिवारी याबाबत घोषणा केली. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ही बंदी "तरुणांना तंबाखूच्या दुष्परिणामांपासून वाचवण्याच्या सरकारच्या दृढ वचनबद्धतेचे" प्रतीक आहे. तंबाखू नियंत्रण मंडळाचे उपाध्यक्ष अहमद अफाल यांनी सांगितले, "गेल्या वर्षी वेपिंगवर बंदी घालणे हे 'तंबाखूमुक्त नागरिकांची पिढी' तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल होते. आता ही नवीन बंदी तंबाखूच्या सर्व प्रकारांना लागू असेल. किरकोळ विक्रेत्यांना कोणत्याही विक्रीपूर्वी ग्राहकांचे वय तपासणे बंधनकारक आहे."

अफाल यांनी स्पष्ट केले की, ई-सिगारेटसारख्या 'स्टायलिश गॅझेट्स'च्या माध्यमातून तंबाखू उद्योग तरुण पिढीला व्यसनाधीन बनवत होता, त्यामुळे ही कठोर पाऊले उचलणे आवश्यक होते. मालदीवने मागील वर्षीच इलेक्ट्रॉनिक सिगारेट आणि वेपिंग उत्पादनांची आयात, विक्री, वापर आणि वितरण पूर्णपणे बेकायदेशीर ठरवले आहे.

Maldives tobacco ban
Zohran Mamdani NYC Mayor: झोहरान ममदानींनी इतिहास घडवला! ठरले न्यूयॉर्कचे पहिले भारतीय-अमेरिकन महापौर

पर्यटनावर परिणाम होणार?

या कायद्याचे पालन मालदीवला भेट देणाऱ्या पर्यटकांनाही करावे लागणार आहे. मात्र, या बंदीमुळे देशाच्या पर्यटनावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, असा सरकारचा विश्वास आहे. "लोक केवळ धूम्रपान करण्यासाठी मालदीवला येत नाहीत. ते इथल्या समुद्रकिनाऱ्यांसाठी, समुद्रासाठी, सूर्यप्रकाशासाठी आणि ताज्या हवेसाठी येतात," असे अफाल यांनी स्पष्ट केले. नवीन नियम लागू होऊनही गेल्या वर्षभरात पर्यटकांची कोणतीही बुकिंग रद्द झालेली नाही, उलट पर्यटकांची संख्या वाढली आहे. पुढील वर्षी २० लाखांहून अधिक पर्यटक येण्याचा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर देशांमध्ये योजना बारगळल्या

मालदीवने हा ऐतिहासिक कायदा लागू केला असताना, न्यूझीलंड आणि यूकेमध्ये मात्र जनरेशनल स्मोकिंग बंदीच्या नियमांमध्ये अडथळे आले आहेत. न्यूझीलंडमध्ये नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर २०२३ मध्ये हा नियम रद्द करण्यात आला. यूकेमध्ये २००९ नंतर जन्मलेल्यांना धूम्रपानापासून रोखणारे विधेयक सध्या संसदेच्या अंतिम टप्प्यात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news