Malaysia Tourism : भारतीय पर्यटकांची संख्या दुप्पट करण्यासाठी मलेशिया प्रयत्नशील

मलेशियाच्या पर्यटन विभागाचे उपसंचालक अकबल सेठिया यांनी दिली माहिती
Malaysia Tourism
थियॉन होउ या बुद्धमंदिराला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. या मंदिरात असलेल्या मूर्ती आपल्या भव्यतेसाठी प्रसिद्ध आहेत.pudhari photo
Published on: 
Updated on: 

क्वालालंपूर : राजेश नाईक

मलेशिया आणि भारत यांचे जुने सांस्कृतिक संबंध आहेत. दरवर्षी सुमारे ११ लाख भारतीय पर्यटक मलेशियाला भेट देतात. त्यातून हे संबंध आणखी दृढ होतात. भारतीय पर्यटकांची संख्या दुप्पट व्हावी यासाठी मलेशियाचा पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे, अशी माहिती मलेशियाच्या पर्यटन विभागाचे उपसंचालक अकबल सेठिया यांनी दिली. दक्षिण आशियातून निमंत्रित केलेल्या पत्रकारांशी त्यांनी क्वालालंपूर येथे संवाद साधला.

अकबल सेठिया यांनी मलेशियाने अलीकडे विकसित केलेल्या पर्यटनस्थळांची माहिती दिली. ते म्हणाले, मलेशियामध्ये संपूर्ण आशिया खंडाचे प्रतिबिंब पाहायला मिळते. मलाय, चिनी आणि भारतीयांची संख्या मलेशियामध्ये सर्वाधिक आहे. या देशातून आलेल्या नागरिकांनी आपापली संस्कृती जपली आहे. त्याचबरोबर मलेशियाला संपन्न अशी भौगोलिक पार्श्वभूमी लाभली आहे. एका बाजूला महासागर, तर दुसऱ्या बाजूला पर्वतरांग असे विहंगम दृष्य पर्यटकांना मलेशियात पाहायला मिळते.

Malaysia Tourism
Mumbai Sindhudurg Flight : आजपासून नवी मुंबईहून सिंधुदुर्ग विमानसेवा

अलीकडे मलेशियात साहसी पर्यटनाबरोबरच समुद्र पर्यटन विकसित करण्यात आले आहे. त्यात स्कूबा डायविंग, प्रवाळशोध पर्यटन, मासेमारी आदी प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. प्रवाळांसाठी सीपादम, माबुली, पेनेशियन, रेडांग आदी बेटांवर पर्यटक गर्दी करत आहेत. तसेच सबाह बेटावर अनोखी जैवविविधता पाहायला मिळते. पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीचे दर्शन सीनाँग बीच, तानजुन रुहू, लंकावी कीलीम आदी स्वच्छ आणि सुंदर किनारे पर्यटकांना आकर्षित करतात. लंकावीमध्ये दुर्मीळ अशी खारफुटी पर्यटकांचे विशेष आकर्षण बनले आहे, असे सेठिया म्हणाले.

क्वालालंपूर शहर तर जगातील पर्यटकांचे सर्वाधिक आवडीच्या ठिकाणांपैकी एक आहे. जगप्रसिद्ध द्वीन टॉवर, मलेशिया टॉवर, चायना टाउन, बुकीत बिनतांगसारखी रात्रभर सुरू असणारी बाजारपेठ, लहान मुलांसह थोरामोठ्यांनाही भुरळ घालणारे स्पेस अॅण्ड टाईम क्यूब यासह असंख्य पर्यटनस्थळे क्वालालंपूरमध्ये आहेत. त्यांना अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सेठिया यांनी सांगितले.

त्याचबरोबर जेटिंग हायलँड नावाची उंच टेकडी पर्यटकांना भुरळ पाडते. क्वालालंपूरपासून जवळच असलेले हे बेट थीम पार्कने समृद्ध आहे. या ठिकाणी अधिकृत कॅसिनो चालतो. येथे असणारे केबल कारचे पर्यटकांना आकर्षण असते, असेही सेठिया म्हणाले.

Malaysia Tourism
Sonakshi Sinha Viral Video : सोनाक्षी सिन्हाचे अश्‍लील मॉर्फ केलेल्या फोटोसह व्हिडीओ व्हायरल

क्वालालंपूरजवळ असणारे थियॉन होउ हे बुद्धमंदिर आपल्या अनोख्या वास्तुशैलीसाठी प्रसिद्ध आहे. क्वालालंपूरला आलेला प्रत्येक पर्यटक या मंदिराला भेट दिल्याशिवाय रहात नाही. १९८७ मध्ये या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर १९८९ मध्ये हे मंदिर पर्यटकांसाठी खुले करण्यात आले.

सेपांग आंतरराष्ट्रीय सर्किट ही मलेशियाची नवी ओळख. १९९७ साली सुरू झालेल्या या सर्किटमध्ये सातत्याने मोटारसायकलच्या शर्यती होतात. सुमारे २ लाख लोक या शर्यती पाहण्यासाठी दर खेपेस हजेरी लावतात. जगभरातून विशेषतः इटली, फ्रान्स, इंग्लंड या ठिकाणाहून मोटारसायकलस्वार या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सेपांगला येतात. त्यांची थरारक शर्यत पाहण्यासाठी या देशातील त्यांचे चाहते मोठ्या प्रमाणात मलेशियात दाखल होतात. मलेशियाच्या पर्यटनाचा हादेखील एक मुख्य विषय असतो.

क्वालालंपूर शहरापासून जवळ असलेले बाटू केव्हज हे जगभरातील पर्यटकांचा कुतुहलाचा विषय आहे. सुमारे ४०० दशलक्ष वर्षापूर्वीची चुनखडीची टेकडी सर्वांचे लक्ष वेधून घेते. या टेकडीच्या पायथ्याशी मुरुगन (कार्तिकेय) चा सुवर्ण पुतळा साकारण्यात आला आहे. १४० फुटांचा हा भव्य पुतळा या भागाचे आकर्षण केंद्र आहे. गुहेत प्रवेश करण्यासाठी २७२ सप्तरंगांनी सजवलेल्या पायऱ्या चढाव्या लागतात. आत पुरात शिव-पार्वती मंदिर पाहायला मिळते. या सर्व परिसराचे संचालन तामिळनाडूमधून मलेशियात स्थायिक झालेले नागरिक करतात. शाळांच्या सहली या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येतात. प्रचंड प्रमाणात पर्यटक असूनही येथे कोणत्याही प्रकारचा गोंधळ नसतो. अत्यंत शिस्तबद्धपणे पर्यटक हा परिसर पालथा घालतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.