Mahatma Gandhi London Statue : संतापजनक! महात्मा गांधीचा लंडनधील पुतळा केला विद्रूप, उच्चायुक्तालयाकडून निषेध

Mahatma Gandhi London Statue
Mahatma Gandhi London Statue Pudhari photo
Published on
Updated on

Mahatma Gandhi London Statue :

समाजकंटकांनी लंडन येथील टाव्हस्टॉक स्क्वेअर येथील महात्मा गांधी यांचा पुतळा विकृत केल्याची घटना सोमवारी घडली आहे. विशेष म्हणजे गांधी जयंतीच्या आदल्या दिवशी हा प्रकार घडल्यामुळं भारतीय लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. भारताच्या उच्चायुक्तालयानं या प्रकारानंतर कडक शब्दात आपला निषेध नोंदवला आहे. त्यांनी ही लाजीरवाणी घटना असल्याचं म्हटलं.

याबाबत लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयानं ट्विट केलं. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात. 'या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली होती. स्थानिक प्रशासनातील काही अधिकारी घटना स्थळी पोहचले आहेत. ते पुतळा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.'

Mahatma Gandhi London Statue
Marijuana Drug: गांजापासून बनवलेल्या औषधाने पाठदुखी होते कमी; नव्या अभ्यासात निष्कर्ष

महात्मा गांधींना भारताचे फादर ऑफ द नेशन म्हणून संबोधलं जातं. त्यांचा लंडनमध्ये ध्यानाला बसलेल्या मुद्रेतील पुतळा बसवण्यात आला आहे. हा पुतळा काही भारत विरोधी समाज कंटकांनी विद्रूप केला. यानंतर भारतीय उच्चायुक्तालयानं ही एक लाजीरवाणी घटना आहे असं सांगितलं.

तसंच, 'हा फक्त पुतळा विद्रूप करण्याचा प्रकार नाहीये तर अहिंसेच्या विचारधारेवर केलेला हिंसक हल्ला आहे. हा हल्ला आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवसाच्या आधी दोन दिवस झाला आहे. हा हल्ला महात्मा गांधी यांच्या वारशावर करण्यात आला आहे. आम्ही याची गंभीर दखल घेतली आहे. स्थानिक प्रशासनाला याबाबत त्वरित कारवाई करण्यास सांगितलं आहे. आमची टीम घटनास्थळी पोहचली आहे. आम्ही प्रशासनाला पुतळा पूर्वस्थितीत आणण्यासाठी मदत करत आहोत.' असं देखील उच्चायुक्तालयानं सांगितलं.

Mahatma Gandhi London Statue
POK Protest News : पाक व्याप्त काश्मीरमध्ये उडाला आंदोलनाचा भडका! शहाबाज शरीफ सरकारविरूद्ध लोकं उतरली रस्त्यावर

दरम्यान, स्थानिक प्रशासनानं या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे असं सांगितलं. गांधी जयंती ही जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केली जाते. यावेळी लंडनमधील या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गांधीजींचे आवडत्या भजन गायनाचा कार्यक्रम देखील आयोजित केला जातो.

लंडनमधील हा पुतळा ब्रॉन्झचा असून हा पुतळा फ्रीडा ब्रिलियंट यांनी तयार केला आहे. या पुतळ्याचं अनावरण हे १९६८ मध्ये गांधी जयंतीला करण्यात आलं होते. महात्मा गांधी हे युनिव्हरसिटी कॉलेज ऑफ लंडनचे कायद्याचे विद्यार्थी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news