POK Protest News : पाक व्याप्त काश्मीरमध्ये उडाला आंदोलनाचा भडका! शहाबाज शरीफ सरकारविरूद्ध लोकं उतरली रस्त्यावर

हे लोक आंदोलन आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठं आंदोलन म्हणून गणलं जात आहे.
POK Protest News
POK Protest Newspudhari news
Published on
Updated on

POK Protest News :

पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये आज (दि२९) पाकिस्तान सरकारविरूद्ध मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर उतरले. हे लोक आंदोलन आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठं आंदोलन म्हणून गणलं जात आहे. अवामी अॅक्शन कमिटीनं आजच्या आंदोलनाची हाक दिली होती.

अवमी कमिटीनं बंद आणि चक्का जामचा नारा दिला होता. या आंदोलनानं भागात चांगलाच तणाव निर्माण झाल्यानंतर पाकिस्तान सरकारनं इस्लामाबादवरून सुरक्षा दळं पाक व्याप्त काश्मीर मध्ये पाठवली आहेत. त्याचबरोबर या भागातील इंटरनेट सेवा देखील मध्यरात्रापासून बंद करण्यात आली आहे.

POK Protest News
India Vs Pakistan : ऑपरेशन सिंदूर 2.0 नंतर BCCI नं उघडला खजिन्याचा दरवाजा.... टीम इंडियावर पैशांची बरसात

अवामी कमिटीला गेल्या महिन्यापासून पाक व्याप्त काश्मीरमध्ये चांगला जनाधार लाभत आहे. त्यांच्या नावावर हजारो लोकं रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. या भागातील सर्व लोकांचा पाकिस्तान सरकारनं पाक व्याप्त काश्मीरकडे राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

या भागाचा विकास करण्यासाठी अवामी कमिटीनं ३६ मागण्या ठेवल्या आहेत. यात स्ट्रक्चरल रिफॉर्म, पाक व्याप्त काश्मीरमधून पाकिस्तानमध्ये राहण्यास आलेल्या काश्मीरी शरणार्थींसाठी १२ जागा राखीव ठेवण्यासाठीची मागणी केली आहे. याचबरोबर अनुदान आणि राज्यातील प्रोजेक्ट्समधून मिळणारा कर वाढवून देण्यात यावा अशा मागण्यांचा समावेश आहे.

अवामी कमिटीचीचे प्रमुख नेते शौकत नवाज मीर म्हणाले, 'आमचं कॅम्पेन हे कोणत्याही संस्थेविरूद्ध नाहीये. मात्र आमच्या लोकांना गेल्या ७० वर्षात मुलभूत अधिकार नाकारण्यात आले आहे. हे आंदोलन त्याबाबत आहे. आता खूप झालं. आमचे हक्क आम्हाला द्या नाहीतर लोकांच्या रोषाला सामोरे जा.'

POK Protest News
Asia Cup Trophy Row : अशा व्यक्तीकडून ट्रॉफी घेणं... नक्वींच्या हातून ट्रॉफी का नाकारली; BCCI नं स्पष्टच सांगितलं

दरम्यान, हजारो लोक रस्त्यावर उतरलेले पाहिल्यानंतर पाकिस्तान सरकार लगेचच सक्रीय झालं आहे. काही दिवसांपासून पाक व्याप्त काश्मीरमध्ये सशस्त्र दलाच्या अनेक गाड्या शहरात मार्च करत आहेत. हजारो सशस्त्र सैनिक पंजाबमधून पाक व्याप्त काश्मीरमध्ये पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी महत्वाच्या शहरांच्या एन्ट्री आणि एक्झिट पॉईंटवर नाकाबंदी केली आहे.

इस्लमाबाद मधील सरकारनं एक हजार अतिरिक्त पोलीस दल देखील तैनात केलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'शांतता ही लोकं आणि प्रशासन या सर्वांची जबाबदारी आहे.' याचबरोबर अवामी कमिटीच्या लोकांसोबत सरकारनं चर्चेचा वेग वाढवला आहे. मात्र १३ तासांच्या चर्चेनंतर कमिटीनं वाटाघाटी करण्यास नकार दिला आहे. त्यांनी चर्चा ही अपूर्ण आणि कोणत्याही निष्कर्षाविना संपल्याचं सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news